जळगाव लाईव्ह न्यूज । ८ फेब्रुवारी २०२५ । दिल्ली विधानसभा निवडणूक २०२५ (Delhi Assembly Elections) चा निकाल हाती आला असून यात आपच्या सत्तेला सुरुंग लावण्यास भाजपला (BJP) मोठं यश आले आहे. विशेष म्हणजे दिल्लीचे माजी मुख्यमंत्री व आपचे संस्थापक अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्यासोबतच माजी मुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांचाही पराभव झाला आहे.

राजधानी दिल्लीत भाजपने तब्बल 47 जागांवर मुसंडी मारली आहे. तर आम आदमी पक्षाला केवळ 23 जागांवर समाधान मानावे लागले आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत काँग्रेसला भोपळाही फोडता आलेला नाही. त्यामुळे तब्बल 27 वर्षानंतर नवी दिल्लीत भाजपचे कमळ फुलले आहे. या निकालानंतर दिल्लीत भाजपची एकहाती सत्ता येणार असल्याचे निश्चित झाले आहे.
नवी दिल्लीमधून अरविंद केजरीवाल यांचा १२०० मतांनी पराभव झालाय. भाजपचे प्रवेश वर्मा यांनी केजरीवाल यांचा दारूण पराभव केलाय. तर मनिष सिसोदिया यांनाही पराभवाचा धक्का बसलाय.आम आदमी पक्षाचा हुकूमी एक्काच पडल्याने पक्षाला मोठा फटका बसला आहे. दुसरीकडे पराभवाच्या छायेत असलेल्या दिल्लीच्या मुख्यमंत्री अतिशी या विजयी झाल्या आहेत. 10 वर्षानंतर ‘आप’ला सतेत्तून बाहेर जावं लागलं आहे
या निकालानंतर भाजपला बहुमत मिळालं असून आता भाजपच्या गोटात पुढचा मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा रंगली आहे. भाजपने मुख्यमंत्री चेहरा नसताना निवडणूक लढवली होती. मागील निवडणुका लक्षात घेता भाजप हायकमांड नवीन चेहरा आणून आश्चर्यचकित करणार की ओळखीच्या चेहऱ्यांनाच संधी दिली जाणार? भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी प्रमुख दावेदारांमध्ये दलित नेते दुष्यंत गौतम, माजी मुख्यमंत्र्यांचे पुत्र परवेश वर्मा आणि भाजपचे ज्येष्ठ नेते विजेंद्र गुप्ता यांचा समावेश आहे.