जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जून २०२६ । गेल्या काही दिवसांपासून राज्यातून गायब झालेला मान्सून आता पुन्हा सक्रिय झाला असून महाराष्ट्रातील बहुतांश भागांत दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. विशेष जळगाव जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली. कोकण किनारपट्टीसह पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांत ढगांची घनदाट निर्मिती होत असून आगामी चार ते पाच दिवस राज्यभर चांगल्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

भारतीय हवामान विभागाचे (IMD) पुणे केंद्राचे प्रमुख एस. डी. सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, मान्सून पूर्णपणे सक्रिय झाल्यामुळे वाऱ्यांचा वेग वाढला असून त्यामुळे वेगाने ढगांची निर्मिती होत आहे. याचाच परिणाम म्हणून राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे.

यंदा मान्सूनच्या आगमनास उशीर झाला होता. जून महिन्याच्या सुरुवातीला अपेक्षित पाऊस न झाल्याने राज्यात सरासरी पर्जन्यमानात तब्बल ७२ टक्क्यांची तूट नोंदवली गेली होती. मात्र, पुढील काही दिवसांत होणाऱ्या पावसामुळे ही तूट मोठ्या प्रमाणात भरून निघेल, असा विश्वास हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
हवामान विभागाने गुरुवारपासून रविवारपर्यंत राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी येलो व ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
आगामी ४ दिवसांचा ‘जिल्हानिहाय’ हवामान अंदाज
गुरुवार (आजचा अंदाज)
ऑरेंज अलर्ट (मुसळधार ते अतिमुसळधार): पुणे, सातारा, धाराशिव, लातूर, यवतमाळ आणि चंद्रपूर.
येलो अलर्ट (दमदार पाऊस): मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, अहिल्यानगर, संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली.
ग्रीन अलर्ट: उर्वरित जिल्हे.
शुक्रवार
येलो अलर्ट: मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, अहिल्यानगर, बीड, संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली.
ग्रीन अलर्ट: उर्वरित जिल्हे.
शनिवार
ऑरेंज अलर्ट: सिंधुदुर्ग.
येलो अलर्ट: ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, अहिल्यानगर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली.
ग्रीन अलर्ट: उर्वरित जिल्हे.
रविवार
येलो अलर्ट: मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली.
ग्रीन अलर्ट: उर्वरित जिल्हे.
शेतकऱ्यांना मोठा दिलासा!
जून महिन्याच्या सुरुवातीला पाऊस न झाल्याने बळीराजा चिंतेत होता. अनेक ठिकाणी पेरण्या रखडल्या होत्या, तर काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट होते. मात्र, आता मान्सून सक्रिय झाल्याने आणि पुढील ४ दिवस चांगल्या पावसाचा अंदाज असल्याने रखडलेल्या शेतीच्या कामांना वेग येणार असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.











