ग्राहकांसाठी सुवर्णसंधी! ८ दिवसांत सोनं 10,000, तर चांदी 20 हजारांनी स्वस्त; पाहा जळगावातील ताजे दर..

जून 25, 2026 4:21 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जून २०२६ । सोनं-चांदी खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये आज सराफा बाजार उघडताच दोन्ही सोने आणि चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. आंतरराष्ट्रीय स्तरावर आखाती देशांमधील युद्ध थांबण्याची घोषणा होताच, त्याचे थेट पडसाद जळगावच्या सराफा बाजारात उमटले असून दोन्ही मौल्यवान धातूंचे दर लक्षणीयरीत्या स्वस्त झाले आहेत. दर कमी झाल्यामुळे ग्राहकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

gold silver

आज जळगावच्या सराफा बाजारामध्ये २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये तब्बल ३,००० रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे आज १ तोळा सोन्याचा दर १ लाख ४० हजार रुपयांवर आला आहे. तर १० तोळा सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांचे थेट ३०,००० रुपये वाचणार असून, त्यासाठी १४ लाख रुपये खर्च करावे लागणार आहेत. विशेष म्हणजे, गेल्या ८ दिवसांचा विचार केल्यास सोन्याचे दर तब्बल १०,००० रुपयांनी स्वस्त झाले आहेत.

सोन्यासोबतच चांदीच्या दरानेही ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. जळगावात १ तोळा चांदी थेट ५,००० रुपयांनी स्वस्त झाली असून आज चांदी २ लाख २० हजार रुपये प्रति तोळा दराने विकली जात आहे. गेल्या ८ दिवसांत चांदीच्या दरात २०,००० रुपयांची घसरण नोंदवली गेली आहे.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींचाही या घसरणीमागे मोठा वाटा असल्याचे जाणकारांचे मत आहे. मध्यपूर्वेतील तणाव कमी होण्याच्या संकेतांनंतर सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे असलेला कल काहीसा कमी झाला असून त्याचा परिणाम थेट दरांवर झाला आहे. दरम्यान, बाजार विश्लेषकांच्या मते आगामी काही दिवसांत जागतिक घडामोडी आणि डॉलरच्या हालचालींवर सोन्या-चांदीचे दर अवलंबून राहणार आहेत. त्यामुळे ग्राहकांनी खरेदीपूर्वी दरांची माहिती घेऊनच व्यवहार करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now