जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जून २०२६ । सोने-चांदी खरेदी करण्याची इच्छा असलेल्या ग्राहकांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. आज सराफा बाजार उघडताच सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. विशेष म्हणजे, सलग दुसऱ्या दिवशी दरात घसरण झाल्यामुळे ग्राहकांना आणि लग्नकार्यासाठी खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

आज बाजार उघडताच २४ कॅरेट १ तोळा (१० ग्रॅम) सोन्याच्या भावात तब्बल १८०० रुपयांची घसरण झाली आहे. या मोठ्या घसरणीनंतर आजचा सोन्याचा ताजा दर १,४०,१३० रुपये प्रति तोळा इतका झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढणाऱ्या सोन्याच्या दराला अखेर ब्रेक लागल्याने ग्राहकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

सोन्याप्रमाणेच आज चांदीच्या दरातही मोठी घसरण पाहायला मिळत आहे. आज १ किलो (१००० ग्रॅम) चांदीचे दर तब्बल ५००० रुपयांनी गडाडले आहेत. चांदीच्या दरात झालेली ही घसरण गेल्या काही दिवसांतील सर्वात मोठी घसरण मानली जात आहे.
तज्ज्ञांचा महत्त्वाचा अंदाज:
बाजार तज्ज्ञांच्या अहवालानुसार, जागतिक बाजारपेठेतील घडामोडींमुळे पुढील काही दिवसांत चांदीचे दर आणखी घसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे चांदी खरेदीसाठी हा काळ योग्य ठरू शकतो.











