⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

Thunder Storm : वादळामुळे आडवी झाली केळी, घरांचे पत्रे उडाले तर युवक जखमी

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मे २०२२ । राज्यातील अनेक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह पूर्वमोसमी पावसाची शक्यता वर्तविली आहे. दरम्यान, रावेर तालुक्यातील अहीरवाडी परीसरात वादळामुळे केळीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेकांचा घरावरील पत्रे देखील उडाले आहे. तर एका २८ वर्षीय युवकाच्या डोक्यावर झाडाची फांदी पडल्याने जखमी झाला आहे. प्रशांत कौतिक सावळे असे जखमी तरुणाचे नाव आहे.

आज दुपारी अहीरवाडी परीसरात वादळी वाऱ्याने दस्तक दिली. यामुळे काही शेतक-यांचे केळीचे नुकसान झाले आहे. अहीरवाडी गावात काही घरां वरील पत्रे उडाले असून प्रशांत कौतिक सावळे हा युवक त्यांच्या गुरांच्या गोठ्यामध्ये जात असतांना त्यांच्या डोक्यावर सुबाभुळ या झाडाची फांदी पडल्याने त्याच्या डोक्याला दुखापत झाली आहे. तर गोपाळ धनगर या शेतक-याचा केळीचा बाग पूर्ण झोपला आहे. घटनेची माहीती मिळताच संदीप सावळे घटनास्थळी पोहचुन पाहणी करत आहे.