---Advertisement---
बातम्या

Crime News : पोलिसांनी पकडलेल्या ‘या’ दोघांचे कृत्य पाहून तुमचा हि उडेल थरकाप

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज : १ मार्च २०२३ : चौघांनी पिस्टलाच्या धाकावर लूट करीत मोबाईलसह दुचाकी लांबवल्याची घटना सोमवारी रात्री अंजाळे घाटात घडली होती. या गुन्ह्यातील चार संशयीतांपैकी दोन सशंयीतांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

crime news jpg webp webp

यावल शहरातील अजय मोरे हा तरुण सोमवारी रात्री 10 वाजता भुसावळकडून यावलकडे दुचाकीने येत असताना अंजाळे घाटात अज्ञात चार दरोडेखोरांनी अजयचा रस्ता अडवत पिस्टलाचा धाक दाखवून त्याच्याजवळील मोबाईल आणि त्याची दुचाकी लांबवली होती.

---Advertisement---

या प्रकाराने अजयने यावल पोलिसात तक्रार देत आपबिती कथन करताच यावल पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या आदेशावरून पोलिस उपनिरीक्षक अविनाश दहिफळे, सहाय्यक फौजदार मुजफ्फर पठाण व सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घैतली. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवून रस्ता लूट प्रकरणातील दोन दरोडेखोरांना यावल शिवारातून अटक करण्यात आली.करण रमेश पवार आणि विक्की अंकुश साळवे (दोन्ही रा.आसोदा, ता.जि.जळगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे असून त्यांचे दोन साथीदार पसार झाले असून त्यांचाही शोध सुरू आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---