⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

बीएचआरमधील ठेवींवर दाम्पत्याला ६ टक्के व्याज देण्याचे न्यायालयाचे आदेश

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जानेवारी २०२२ । जामनेर येथील दाम्पत्यास बीएचआरमध्ये २८ लाख रुपये ठेव व ४८ हजार रुपये बचत खात्यात ठेव ठेवली आहे. दरम्यान, हे पैसे परत मिळेपर्यंत दोन्ही रकमांवर दरवर्षी सहा टक्के दराने व्याज देण्यात यावे, असे आदेश ग्राहक न्यायालयाने दिले आहेत.  

याबाबत असे की, भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीत (बीएचआर) जामनेर येथे राहणाऱ्या कासाबाई व सीताराम लोटू पाटील या दाम्पत्याने सन २०१०मध्ये २८ लाख रुपये ठेव व ४८ हजार रुपये बचत खात्यात ठेव ठेवली होती. या दाम्पत्याने वेळोवेळी येणाऱ्या योजनांत पैसे ठेवलेले होते. सन २०१४पासून त्यांच्या ठेव पावत्यांची मुदत पूर्ण झाली. यानंतर दाम्पत्याने पैसे परत मिळवण्यासाठी बीएचआरच्या मुख्य शाखेत पायपीट केली; परंतु त्यांना प्रत्येक वेळी उडवाउडवीची उत्तरे मिळाली. पतपेढी अवसायनात गेली असल्याने पैसे परत मिळणार नाहीत असे त्यांना सांगण्यात आले. अखेर या दाम्पत्याने २ मार्च २०२० रोजी ग्राहक न्यायालयात धाव घेतली. 

यावेळी यात दोन्ही बाजूच्या युक्तिवादाअंती न्यायालयाने पाटील दाम्पत्याच्या बाजूने निकाल दिला. त्यांच्या ठेव पावत्या मॅच्युअर्ड झालेल्या असल्याने देय रक्कम बीएचआरने परत करावी. मुदत ठेवीचा कालावधी संपल्यापासूनच्या प्रत्येक वर्षाला सहा टक्के प्रमाणे व्याज द्यावे. बचत खात्यातील ४८ हजार रुपयांवरही दरवर्षी सहा टक्के व्याज द्यावे. तक्रारदारांना शारीरिक मानसिक त्रासापाेटी १० हजार रुपये नुकसान भरपाई व तक्रारीच्या खर्चापोटी पाच हजार रुपये द्यावे, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. पाटील दाम्पत्यातर्फे भुसावळ येथील अॅड. राजेश उपाध्याय यांनी काम पाहिले.

हे देखील वाचा :