⁠ 
गुरूवार, डिसेंबर 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

मुक्ताईनगर कोर्टाचे दमानिया व शर्मा यांच्या विरोधात वॉरंट जारी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मार्च २०२१ । मुक्ताईनगर येथील न्यायालयाने सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि प्रीती शर्मा-मेनन यांना उपस्थित राहण्याचे आदेश देत अटक वॉरंट जारी केले आहे.

रमेश ढोले यांनी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची बदनामी केल्याचा आरोप करत अंजली दमानिया आणि प्रीती शर्मा-मेनन यांच्या विरोधात मुक्ताईनगर येथील कोर्टात बदनामीचा खटला दाखल केला आहे. या खटल्यात वारंवार सूचना देऊन देखील ते हजर राहत नव्हते. यामुळे न्यायालयाने सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि प्रीती शर्मा-मेनन यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करून त्यांना १० मे पर्यंत न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.