जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावच्या नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध गोवंश कत्तल प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत ९ आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून तब्बल १२ लाख २० हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या मोठ्या कारवाईमुळे अवैध कत्तल करणाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

२८ मे रोजी नशिराबाद पोलीस ठाण्याच्या प्रभारी महिला सहायक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे या पथकासह पेट्रोलिंगवर असताना, त्यांना नशिराबाद च्या फातेमा नगर भागात परवीन कुरेशी आणि मुक्तार कुरेशी यांच्यासह काही इसम गोवंश जनावरांची अवैधरित्या कत्तल करत असल्याची गुप्त माहिती मिळाली. घटनेचे गांभीर्य ओळखून जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी तात्काळ पथक तयार करून छापा टाकण्याचे आदेश दिले.

मिळालेल्या आदेशानुसार, सपोनि योगिता नारखेडे यांनी आपल्या पथकासह मध्यरात्री सदर ठिकाणी अचानक छापा टाकला. या कारवाईदरम्यान पोलिसांनी एकूण ९ आरोपींना जागीच पकडले आणि गोवंशाची कत्तल करण्यापासून रोखले. आरोपींच्या ताब्यातून ३ गायी, १ बैल, ९ गोन्हे, २ लहान वासरे तसेच सुमारे २०० किलो गोवंश सदृश्य जनावरांचे मांस जप्त करण्यात आले. याशिवाय मांस वाहतूक आणि विक्रीसाठी वापरण्यात आलेली वाहनेही पोलिसांनी ताब्यात घेतली. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत १२,२०,९०० रुपये असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हरेष पाटील करीत आहेत.
यांनी केली कारवाई?
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांच्या नेतृत्वाखालील पो.उपनिरी/ रविंद्र तायडे, पो उप निरी/हरेष पाटील, सफौ शरद सोनार, सफौ/ राजेश मेंढे, पोहेकॉ चंद्रकांत पाटील, पोहेकॉ गुणवंत देखमुख, पोहेकॉ प्रशांत विरणारे, पोहेकॉ कमलाकर बागुल, पोकॉ भरत बाविस्कर, पोकॉ पंकज सोनवणे, पोकॉ विठ्ठल मुंढे, पोकॉ सागर बिडे, पोकॉ विजय अहिरे, पोकॉ भुषण पाटील, पोकॉ रामकृष्ण माळी यांचा समावेश होता.







