पाचोऱ्यात लॉजमध्ये प्रेमीयुगुलाचे टोकाचे पाऊल; प्रियकराचा मृत्यू, प्रेयसी बचावली

मे 29, 2026 11:16 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । पाचोऱ्यातून एक खळबळजनक घटना समोर आलीय. शहरातील गोराडखेडे रोडवरील एका लॉजमध्ये प्रेमीयुगुलाने गळ#$फास घेऊन आत्म@#हत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून या घटनेत प्रियकराचा जागीच मृत्यू झाला आहे, तर गळफास तुटल्याने अल्पवयीन प्रेयसीचा जीव थोडक्यात बचावला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

crime jpg webp

रवींद्र संजय मोरे (वय २५, रा. गिरड, ता. भडगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नक्की काय घडले?

पोलीस आणि लॉज सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रवींद्र मोरे आणि त्याची अल्पवयीन प्रेयसी हे दोघे गुरुवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास गोराडखेडे रोडवरील एका लॉजमध्ये आले होते. खोलीत गेल्यानंतर दोघांनीही पंख्याला गळ#$ फास लावून आत्म#$ हत्या करण्याचा प्रयत्न केला.या दुर्दैवी घटनेत रवींद्रचा जागीच मृत्यू झाला. मात्र, सुदैवाने अल्पवयीन मुलीचा गळ#$फास तुटल्यामुळे ती खाली पडली आणि तिचा जीव वाचला.

घटनेनंतर घाबरलेल्या मुलीने तातडीने खोलीबाहेर येत लॉज कर्मचाऱ्यांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली आणि रवींद्रला रुग्णालयात नेण्याची विनंती केली. कर्मचाऱ्यांनी तातडीने रवींद्रला एका खाजगी रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. दरम्यान, मृत रवींद्र मोरे याच्या नातेवाइकांनी या संपूर्ण घटनेवर तीव्र संशय व्यक्त केला आहे. हा प्रकार आत्म@#हत्येचा नसून संशयास्पद असल्याचा दावा करत, पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी नातेवाइकांनी केली आहे. पाचोरा पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now