जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जानेवारी २०२२ । जळगाव जिल्ह्यात आज पुन्हा नव्या बाधित रुग्णांपेक्षा बरे होणार्या रुग्णांची संख्या जास्त आहे. जिल्ह्यात आज शनिवारी दिवसभरात २६८ कोरोना बाधित आढळून आले आहे, तर ४५१ जण कोरोना आजारातून बरे होऊन घरी परतले आहे.

आज आढळून आलेल्या २६८ बाधित रुग्ण संख्येनंतर जिल्ह्यात एकूण कोरोना बाधितांची संख्या १ लाख ४९ हजार ९७९ वर गेली आहे. त्यापैकी १ लाख ४४ हजार ११० कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. सध्या जिल्ह्यात ३ हजार २२४ कोरोना रूग्ण विविध कोवीड सेंटरमध्ये उपचार घेत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २ हजार ५८५ कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

असे आढळले रुग्ण
जळगाव शहर-४७, जळगाव ग्रामीण -१६, भुसावळत-२२, अमळनेर-४, चोपडा-९, पाचोरा-५, भडगाव-४, धरणगाव-३, यावल-२३, एरंडोल-१०, जामनेर-६०, रावेर-२, पारोळा-६, चाळीसगाव-४१, मुक्ताईनगर-१, बोदवड-१२ आणि इतर जिल्ह्यातील ३ असे एकूण २६८ रुग्ण आढळून आले आहे.
हे देखील वाचा :
- चाळीसगाव पोलिसांची अवैध गुटखा तस्करांवर मोठी कारवाई; लाखोंच्या मुद्देमालासह ५ जण गजाआड!
- पावसाळ्यात विकेंडचा प्लॅन करताय? मग जळगाव जिल्ह्यातील ‘या’ निसर्गरम्य स्थळांना नक्की भेट द्या!
- काईट फोरमतर्फे जिल्ह्यातील स्टार्टअप फाऊंडर्स व को-फाऊंडर्सचा सत्कार
- दमदार पुनरागमनंतर जळगाव जिल्ह्यात मान्सूनला ‘ब्रेक’? वाचा हवामान विभागाचा चिंताजनक अंदाज..
- राष्ट्रीय स्पर्धेत जळगाव पोलिसांच्या स्केटिंग क्लबची दमदार कामगिरी












