जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जानेवारी २०२२ । जळगाव जिल्ह्यात आज कोरोना रुग्णांच्या संख्येत घट दिसून आल्याने दिलासा मिळाला आहे. गेल्या दोन दिवसापासून जिल्ह्यात ३०० च्या वर कोरोना रुग्ण आढळून येत होती. परंतु आज सोमवारी दिवसभरात २१७ नवे रुग्ण आढळून आहे. तर आज ८९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जळगाव शहरासह भुसावळ तालुक्यात कोरोना रूग्ण जास्त प्रमाणात आढळून आले आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १ लाख ४५ हजार ३७६ कोरोना बाधित आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार ५४७ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २ हजार ५८० रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या २ हजार २४९ बाधित रूग्ण उपचार घेत आहे.

असे आढळून आले रुग्ण
जळगाव शहरात-८८, जळगाव ग्रामीण-३, भुसावळ -६०, अमळनेर-९, चोपडा-२०, पाचोरा-५, भडगाव-०, धरणगाव-०, यावल-०, एरंडोल-१, जामनेर-१, रावेर-५, पारोळा-५, चाळीसगाव-१८, मुक्ताईनगर-३, बोदवड-० असे एकुण २१७ बाधित रूग्ण आढळून आले आहे.
हे देखील वाचा
- लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट; कधी येणार १५०० रुपये? तारीख आली समोर?
- आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात मोठी वाढ ; जाणून घ्या जळगावातील आजचे प्रति तोळा दर
- आषाढी एकादशीनिमित्त बालरंगभूमी परिषदेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन
- जळगाव जिल्हा केमिस्ट संघटनेच्या अध्यक्षपदी सुनील भंगाळेंची बिनविरोध निवड
- जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळणार; वाचा पुढील 5 दिवसाचा हवामान अंदाज?











