जिल्ह्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची घंटा : एकाच दिवशी आढळले ‘इतके’ रुग्ण

सप्टेंबर 8, 2021 10:17 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ सप्टेंबर । मागील काही दिवसापासून जळगाव जिल्ह्यात नवीन रुग्ण संख्या ५ च्या आत आढळून येत होती. परंतु आज नव्या रुग्ण संख्येत किंचित वाढ झाली आहे, आज बुधवारी जिल्ह्यात ६ नवे रुग्ण आढळून आले आहे. तिसऱ्या लाटेच्या धोक्याची घंटा असल्याची दिसून आले आहे.

corona update

आज जळगाव शहरात रुग्ण संख्या किंचित वाढताना दिसून आली आहे. आजच्या रुग्णसंख्येसह जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ४२ हजार ७१९ कोरोना रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार १२१ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात २३ सक्रिय रूग्ण विविध ठिकाणी उपचार घेत आहे.

आज दिवसभरात जळगाव शहरात ४, भुसावळ तालुक्यात १ आणि चोपडा तालुक्यात १ असे एकुण ६ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now