जळगाव जिल्ह्यात आज कोरोनाची रुग्णसंख्या ४० च्या आत

जून 24, 2021 7:06 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जून २०२१ । जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा उतरता आलेख सुरूच आहे. गेल्या तीन ते साडेतीन महिन्यानंतर जिल्ह्यात आज नवीन रुग्ण संख्या ४० च्या आत आढळून आली आहे. आज दिवसभरात कोरोनाचे केवळ ३५ नवे रुग्ण आढळून आले आहे. तर आज पुन्हा एकही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. हा सर्वात मोठा दिलासा आहे. दरम्यान, आज दिवसभरात १५९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे.

corona logo

जळगाव जिल्ह्यात एप्रिलच्या अखेरच्या आठवड्यापासून कोरोनाचा संसर्ग कमी होऊ लागला. मे व जून महिन्यात नव्या रुग्णांसह सक्रिय रुग्णांमध्ये कमालीची घट आली. जूनच्या शेवटच्या टप्प्यात रोजच्या रुग्णांचा आकडा पन्नाशीच्या आत स्थिर झाला आहे. आज ३५ रुग्ण आढळून आले. आजच्या रुग्ण वाढीनंतर जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या एक लाख ४२ हजार १०७ इतकी झाली आहे. त्यापैकी १ लाख ३८ हजार ५७१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. जिल्ह्यात आजपर्यंत २५६९ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या ९६७ रुग्णांवर उपचार सुरु आहे.

आजचे रुग्ण
जळगाव शहर ०२, जळगाव ग्रामीण-०४, भुसावळ-०३, अमळनेर-०२, चोपडा-०१, पाचोरा-०१, भडगाव-००, धरणगाव-०४, यावल-०२, एरंडोल-०२, जामनेर-०४, रावेर-०२, पारोळा-०४, चाळीसगाव-०३, मुक्ताईनगर-०१, बोदवड-०० आणि इतर जिल्ह्यातील ०० असे एकुण ३५ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now