जळगाव जिल्ह्यातील आजची अधिकृत आकडेवारी : २४ जुलै २०२१

जुलै 24, 2021 6:28 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जुलै २०२१ । जळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा उतरता आलेख कायम आहे. आज शनिवारी जिल्ह्यात सर्वाधित कमी म्हणजेच अवघे ३ नवीन बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे जिल्हा कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर येवून पोहोचला आहे. तर आज ०९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. विशेष म्हणजे आज १५ तालुक्यांमध्ये १३ तालुके निरंक आले.

corona update

जिल्ह्यात गेल्या एक ते दीड महिन्यापासून रोज १० ते २० च्या आत रुग्ण संख्या आढळून येत आहे. जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव मार्च ते मे अशा दोन-अडीच महिन्यांमध्ये तीव्रतेवर होता. नंतर मात्र लाट ओसरायला सुरवात झाली आणि आता जुलैच्या अखेरीस सक्रिय रुग्णसंख्या शंभराच्या टप्प्यात येण्यापर्यंत संसर्ग नियंत्रणात आला आहे.  

जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या १,४२,५५५ इतकी झाली आहे. त्यात उपचार घेऊन बरे  होऊन सुखरूप घरी गेलेले रुग्णांची संख्या १ लाख ३९ हजार ८८६ वर आहे. जिल्ह्यात सध्या ९४ रुग्णांवर उपचार सुरू आहे. आज एकही रुग्णांचा मृत्यू झालेला नाहीय. जिल्ह्यात आज पर्यंत २५७५ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

आजची आकडेवारी

जळगाव शहर-००, जळगाव ग्रामीण-०१, भुसावळ -००, अमळनेर -०१, चोपडा-००, पाचोरा-००, भडगाव-०, धरणगाव-०, यावल-००, एरंडोल-०, जामनेर-००, रावेर -०, पारोळा-०, चाळीसगाव-०१, मुक्ताईनगर-०, बोदवड-० असे एकुण ३ बाधित रूग्ण आढळले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now