जळगाव जिल्ह्यातील अधिकृत कोरोना आकडेवारी : २१ मे २०२१

मे 21, 2021 7:17 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मे २०२१ ।  जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून करोनाबाधितांची संख्या मंदावतांना दिसत असल्याने जिल्ह्याच्या दृष्टीकोनातून दिलासादायक बाब मानली आहे. मागील आठवडाभरापासून आकडा कमी- कमी होत आला आहे. दरम्यान, आज शुक्रवारी जिल्ह्यात ४१० नवे बाधित रुग्ण आढळून आले आहे. तर आज तब्बल ७५६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे.  गेल्या तीन चार दिवसांत दुपटीने रुग्ण संख्या कमी होऊ लागली आहे. शिवाय, मृतांचा आकडा देखील खाली असला तरी दिवसभरात ०९ जणांचा मृत्‍यू झाला.

corona

मे महिन्याच्या सुरुवाती पासून जिल्ह्यात कोरोनाची रुग्ण संख्या कमी होऊ लागली आहे. महिनाभरापासून लावण्यात आलेले लॉकडाउनच्या निर्बंधांचा हा परिणाम असून येत्‍या काही दिवसात आकडा कमी होण्याची शक्‍यता आहे. मात्र तिसऱ्या लाटेची शक्‍यता वर्तविण्यात येत असल्‍याने प्रत्‍येकाने काळजी घेणे महत्‍त्‍वाचे आहे.

आज ४१० नवे रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या १ लाख ३७ हजार ५४६ वर गेली आहे. त्यापैकी १ लाख २६ हजार २८९ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तर सद्यस्‍थितीला ८ हजार ७८८रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. अर्थात बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक असल्‍याने ॲक्‍टिव रूग्‍णांची संख्या देखील आणखी कमी होईल. तर गेल्या २४ तासात ०९ जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृताचा आकडा २४६९ वर गेला आहे.

आजची आकडेवारी

जळगाव शहर-३०, जळगाव ग्रामीण-१९, भुसावळ-२७, अमळनेर-२६, चोपडा-४२, पाचोरा-४५, भडगाव-५, धरणगाव-१४, यावल-०६, एरंडोल-०३, जामनेर-४४, रावेर-२२, पारोळा-१०, चाळीसगाव-३८, मुक्ताईनगर-४३, बोदवड-२४ आणि इतर जिल्ह्यात ३

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Stories