जिल्ह्यातील कोरोनाचा उतरता आलेख कायम ; आज २ नवीन रुग्ण

ऑगस्ट 19, 2021 6:29 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ ऑगस्ट २०२१ । जळगाव जिल्ह्यात दोन महिन्यांपासून कोरोनाचा उतरता आलेख कायम आहे. संपूर्ण जुलै महिन्यात जिल्ह्यात रोज आढळून येणाऱ्या नव्या रुग्णांची संख्या दहा- पंधराच्या आतच राहिलेली आहे. असे असताना गेल्या तीन-चार दिवसांपासून बोदवड तालुक्यात काही प्रमाणात संसर्ग वाढू लागला आहे.

corona

आज गुरुवारी जिल्ह्यात दिवसभरात कोरोनाचे २ नवीन रुग्ण आढळून आले आहे. बोदवड सोडले तर अवघ्या १४ तालुक्यांमध्ये आज एकही रुग्ण आढळून आलेला नाहीय. तर ३रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. दरम्यानं, गेल्या २४ तासात एकही मृत्यू झालेला नाही.

जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ४२ हजार ६७३ बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार ०६६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर ३२ संक्रमित रुग्ण जिल्ह्यातील विविध कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहे. आजपर्यंत २५७५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा बरे होण्याचा रिकव्हरी रेट ९८.१७ इतका आहे.

आजची आकडेवारी 

जळगाव शहर-००, जळगाव ग्रामीण-००, भुसावळ -००, अमळनेर -००, चोपडा-००, पाचोरा-००, भडगाव-००, धरणगाव-००, यावल-००, एरंडोल-००, जामनेर-००, रावेर -००, पारोळा-०, चाळीसगाव-००, मुक्ताईनगर-००, बोदवड-०२ असे एकुण ०२ बाधित रूग्ण आढळले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now