जळगाव शहरासह जिल्ह्यातील ११ तालुके निरंक ; वाचा आजची आकडेवारी

जुलै 13, 2021 6:51 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जुलै २०२१ । जळगाव जिल्ह्यातील कोरोना संसर्ग आटोक्यात येत आहे. मागील काही दिवसापासून दररोज नवीन रुग्ण संख्या १० ते २० च्या आत आढळून येत आहे. आज मंगळवारी जिल्ह्यात दिवसभरात नवीन ०६ रुग्ण आढळून आले आहे. तर २६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. गेल्या २४ तासात एकही मृत्यूची नोंद नाहीय.  दरम्यान, आज जळगाव शहरासह ११ तालुके निरंक असल्याचे शासनाच्या प्राप्त अहवालातून दिसून येत आहे.

corona (2)

जळगाव जिल्ह्यातील कोरोनाची दुसरी लाट बऱ्यापैकी ओसरली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने ‘नवीन बाधित कमी व बरे होणारे अधिक’, असे चित्र आहे. मागील काही दिवसापासून रोजच्या रुग्णांची संख्या २० च्या आत राहत असून, त्यामुळे सक्रिय रुग्णसंख्याही घटत आहे.  जिल्ह्यात सध्या २३७ रुग्णांवर उपचार सुरु आहे. 

दरम्यान, जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या १ लाख ४२ हजार ४७५ वर गेली आहे. त्यापैकी १ लाख ३९ हजार ६६४ रूग्ण बरे होऊन घरी गेले आहे. जिल्ह्यात  जिल्ह्यातील मृताचा एकूण आकडा २५७४ वर गेला आहे. 

आजची आकडेवारी

जळगाव शहर- ०, जळगाव ग्रामीण-०, भुसावळ- १,  अमळनेर-२, चोपडा-०, पाचोरा-०, भडगाव -०, धरणगाव -०,  यावल- ०,  एरंडोल -०,  जामनेर- १, रावेर – ०, पारोळा -०, चाळीसगाव- २, मुक्ताईनगर-०, बोदवड -०, इतर जिल्हे  ०  असे एकुण  ६ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now