आजची जळगाव जिल्ह्यातील कोरोनाची अधिकृत आकडेवारी ; ०२ जुलै २०२१

जुलै 2, 2021 7:10 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ०२ जुलै २०२१ । एप्रिलमध्ये हॉटस्पॉट ठरलेल्या जळगाव जिल्ह्यात रुग्णसंख्येत मोठा दिलासा मिळाला. मागील गेल्या दोन दिवसात नवीन रुग्ण संख्या १५ च्या आत आढळून येत होती त्यात किंचित वाढ झाली आहे. आज शुक्रवारी दिवसभरात २० नवे बाधित रुग्ण आढळून आले आहे. तर ६२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. दरम्यान, मागील आठवड्यापासून जिल्ह्यात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही, ही समाधानाची बाब म्हणावी लागेल.

corona

जळगाव जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत काल गुरुवारचा दिवस जळगाव शहर व जिल्ह्यासाठी मोठा दिलासा देणारा ठरला. पहिल्या व दुसऱ्या लाटेत संसर्गात हॉटस्पॉट व मृत्युसंख्येत आघाडीवर गेलेल्या जळगाव शहरात पहिल्यांदाच एकही रुग्ण सापडलेला नाही.  आज शुक्रवारी २० नवे बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या १ लाख ४२ हजार ३४१ वर गेली आहे. तर आज ६२ रुग्ण बरे झाले असून बरे होणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ३९ हजार २०० वर गेली आहे. जिल्ह्यात एकूण मृताचा आकडा २५७० वर गेला आहे. तर जिल्ह्यात सध्या ५७० रुग्णांवर उपचार सुरु आहे.  

जळगाव शहर-०३, जळगाव ग्रामीण-००, भुसावळ-०१, अमळनेर-०१, चोपडा-०१, पाचोरा-००, भडगाव-०१, धरणगाव-००, यावल-००, एरंडोल-००, जामनेर-०२, रावेर-००, पारोळा-००, चाळीसगाव-१०, मुक्ताईनगर-०२, बोदवड-०० आणि इतर जिल्ह्यातील ०० असे एकुण २० बाधित रूग्ण आढळून आले आहे.

 

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now