जळगाव जिल्ह्यातील आजची कोरोना आकडेवारी ; ३० जुलै २०२१

जुलै 30, 2021 6:58 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जुलै २०२१ । जिल्ह्यात कोरोना संसर्ग नियंत्रणात असताना बहुतांश तालुक्यांमधील सक्रिय रुग्णांची संख्या दहाच्या आत आली आहे. त्यामुळे हे तालुके कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. दरम्यान, आज शुक्रवारी दिवसभरात ९ बाधित रुग्ण आढळून आले आहे. तर ११ रुग्ण बरे झाले.

corona update

जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या एक लाख ४२ हजार ५९७ झाली असून, बरे होणाऱ्यांचा आकडा एक लाख ३९ हजार ९३९ वर पोचला आहे. बरे होणाऱ्यांचे प्रमाण ९८.१४ टक्के आहे. जिल्ह्यात आज एकही मृत्यू झालेला नसून एकूण मृताचा आकडा २५७५ वर गेला आहे.

आजची आकडेवारी

जळगाव शहर- 01 , जळगाव ग्रामीण- 00 , भुसावळ- 00 , अमळनेर-00 , चोपडा-01 , पाचोरा-00 , भडगाव-00 , धरणगाव-00 , यावल- 00 , एरंडोल- 00 , जामनेर-00 , रावेर-00 , पारोळा-00 , चाळीसगाव-04 , मुक्ताईनगर-03 , बोदवड-00 आणि इतर जिल्हे 00 असे एकुण 09 बाधित रूग्ण आढळले आहेत.

 

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now