जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जानेवारी २०२१ । राज्यात कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे निर्बंधांमध्ये वाढ होणार असली तरी लॉकडाऊनचा पर्याय निकालात निघाल्याने राज्यातील नोकरदार, सामान्य नागरिक आणि व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत टास्क फोर्सचे तज्ज्ञ आणि आरोग्यमंत्र्यांची बैठक पार पडली. या बैठकीत तुर्तास राज्यात लॉकडाऊन करण्याची गरज नसल्याचा निष्कर्ष निघाला आहे.

लॉकडाऊन ऐवजी निर्बंध आणखी कठोर करण्याच्या निर्णयावर सर्वांचे एकमत झाल्याची माहिती आहे. आता या बैठकीतील माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली जाईल. त्यानंतर बुधवारी संध्याकाळपर्यंत राज्य सरकारकडून नव्या निर्बंधाची नियमावली जारी केली जाऊ शकते.

हे नवे निर्बंध लागू शकतात?
-राज्यात विकेंड लॉकडाऊन लागू होण्याची शक्यता. त्यानुसार शनिवारी आणि रविवारी राज्यात कडकडीत बंद पाळला जाईल.
-विकेंड लॉकडाऊनच्या काळात गार्डन, चौपाट्या आणि धार्मिकस्थळे पूर्णपणे बंद राहतील.
-विकेंड लॉकडाऊनच्या काळात धार्मिक, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमांनाही बंदी.
-सोमवार ते शुक्रवारी रात्री १० ते सकाळी ५ पर्यंत संचारबंदी लागू राहील.
-शाळा, महाविद्यालये आणि पर्यटनस्थळांच्या परिसरात जमावबंदी
हे देखील वाचा :
- उद्दिष्टकेंद्रीत नियोजनातून सेवा संकल्प अभियान यशस्वीपणे राबवा ; जिल्हाधिकारी रोहन घुगे
- कासोदा शिवारातील २३ शेळ्या-बोकड चोरीचा छडा; मध्यप्रदेशातून दोघे गजाआड
- जळगावात प्रेमसंबंधाच्या वादातून विवाहित महिलेचे अपहरण करून खून; आरोपी जेरबंद
- गोदावरी फाउंडेशनच्या संस्थेत डीजेमुक्त गणेशोत्सवाचा संकल्प
- खाकी वर्दीचं स्वप्न पूर्ण होणार! महाराष्ट्रात ८१०० पोलिसांची मेगा भरती?











