जिल्ह्याला कोविशिल्ड, कोवॅक्सिनचा मोठा साठा आज प्राप्त होणार

मे 30, 2021 11:05 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मे २०२१ ।  जिल्ह्यात कोव्हॅक्सिन लसींचा पुरवठा कमी प्रमाणात होत असल्यामुळे काही केंद्र सुरू असतात तर काही बंद अशी स्थिती असून रोज हे चित्र बदलत आहे. दरम्यान, आज रविवारी कोविशिल्ड लसीचे ३१०० डोस तर कोव्हेक्सिन लसीचे ३७०० डोस प्राप्त होणार आहे. ते  नाशिक येथून गाडी सायंकाळी जळगावात पोहोचेल. त्यामुळे सोमवारी केंद्रांवर कोव्हॅक्सिन लस देण्यात येणार आहे.

vaccination on corona is effective

जिल्ह्यात शनिवारी १८ तालुक्यात ४५ वर्षांवरील १७ हजार ९०२ लाभार्थ्यांनी लस घेतली. यात १५ हजार ६९८ नागरिकांनी लसीचा पहिला डोस तर २२०४ नागरिकांनी दुसरा डोस घेतला. शनिवारी सायंकाळी जिल्ह्यात शासकीय केंद्रांवर कोविशील्डचे ९३२० डोस शिल्लक आहे तर खासगी केंद्रावर एकही डोस शिल्लक नाही. तसेच कोव्हॅक्सिनचे शासकीय केंद्रावर ११० तर खासगी केंद्रावर १८१० डोस शिल्लक आहे. कोविशील्ड लसीचे २७५० डोस शिल्लक असल्याने रविवारी शहरात फक्त कोविशील्ड लस देण्यात येईल तर कोव्हॅक्सिनचा एकही डोस सध्या शिल्लक नाही.

शहरात येथे सुरू राहील लसीकरण

शहरात रविवारी १० पैकी ८ केंद्रांवर लसीकरण होईल. रेडक्रॉस सोसायटी, रोटरी भवन, छत्रपती शाहू महाराज रुग्णालय, डी. बी. जैन रुग्णालय, शाहीर अमर शेख हॉस्पिटल, नानीबाई अग्रवाल हॉस्पिटल, मुलतानी हॉस्पिटल, मनपा शाळा क्रमांक ४८ पिंप्राळा याठिकाणी लसीकरण सुरु राहणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now