⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

ऐन उन्हाळ्यात एकमेव जिवंत पाण्याचा स्रोत असलेल्या पायविहिरीचे पाणी दूषित

जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । ऐन उन्हाळ्यात वाढत्या तापमानामुळे जिवाची लाही लिही होत असुन दुर्गंधीयुक्त पाणी पिण्यायोग्य नसल्याने वन्यप्राण्यांसह दर्ग्यावर दर्शनास येणाऱ्या लोकांच्या घशाला कोरड कायम असुन पुर्वापार पासुन तहान भागविणारी पायविहिर तहानलेल्यांच्या प्रतिक्षेत आहे. मागील आठवड्यात सुकळी जंगलातील वनहद्दीलगत असणाऱ्या पायविहिरीत एक निलगाय पडल्याची दुर्देवी घटना घडली होती. आंदाजे सुमारे पाच-सहा दिवसांपासुन निलगायीचा मृतदेह पाण्यात पडुन असल्याने कुजलेल्या स्थितीत होता.यामुळे घटनास्थळी दुर्गंधीयुक्त उग्र वास येत होता तसेच विहीरीतील पाणी दुषित झाले होते.

जंगलातील सदर भागात हि पायविहिर ऐन उन्हाळ्यातील एकमेव जिवंत पाण्याचा स्रोत असुन विहीरीशेजारी पीर बाबा दर्गा आहे. दर्ग्यावर येणारे लोक, वाटसरू तसेच या भागातील वन्यजीवांची तहान भागवणासाठी या विहीरीचे मोलाचे स्थान आहे. वनविभागाकडुन सदर विहिरीतील पाणी व गाळ डिजल इंजिनद्वारे उपसा करण्यात यावा तसेच विहीरीला सरंक्षण कठडे किंवा जाळी बसविण्यात यावी अशी मिगणी वजा अपेक्षा स्थानिक लोकांची आहे. मात्र आठवडा उलटला तरी वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडुन कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. त्याचप्रमाणे वनविभागाने जंगलात ठिकठिकाणी तयार केलेल्या काही पाणवठ्यापैकी काही पाणवठे गळके झाल्याने त्यात पाणी टिकुन रहात नाही असे पाणवठे त्वरीत दुरुस्त करण्यात यावे अशी मागणी असुनही वनविभागाकडुन दुर्लक्ष होत असल्याचा आरोप अनेकांनी केला आहे.

हे देखील वाचा :