जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जानेवारी २०२२ । मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघातील रावेर, मुक्ताईनगर,बोदवड तालुक्यात मे महीन्यात झालेल्या गारपीट,अवकाळी पाऊस व चक्री वादळ अशा नैसर्गिक संकटांमुळे परिसरातील शेतकऱ्यांचे खुप मोठे नुकसान झाले होते.याबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील व आमदार चंद्रकांत पाटील यांनी नुकसानग्रस्तांना तातडीने भरपाई मिळावी अशी सुरुवाती पासूनच मागणी केली होती.

सहा महिने उलटल्यानंतर देखिल रक्कम मिळत नसल्याने, मागील महिन्यात २२ डिसेंबर रोजी मुंबई येथील हिवाळी अधिवेशनात आमदार चंद्रकांत पाटील यांनी शेतकऱ्यांच्या या प्रमुख विषयावर बोलतांना आक्रमकपणे भुमिका घेत जाब विचारला होता.दरम्यान अवघ्या १८ दिवसांत शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची सुमारे सहा कोटी रक्कम ११ जानेवारी रोजी प्राप्त झाली आहे.
मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ३ कोटी ६० लाख ४१ हजार ४४० रुपये, रावेर तालुक्यातील नुकसानग्रस्तांसाठी २ कोटी ३७ लाख ७८ हजार ५५० रुपये,बोदवड तालुक्यातील नुकसग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीपोटी ५३८२० रक्कम प्राप्त झाली आहे.
हे देखील वाचा :
- जळगाव जिल्हा हादरला! वडिलांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये रील स्टार मुलाच्या खुन केल्याचे लिहिले !
- Sikandar : सलमान खानच्या ‘सिकंदर’ चित्रपटचा टीझर रिलीज
- लोककलेचा जागर करीत मराठी भाषा गौरव दिन साजरा
- उपमुख्यमंत्री शिंदेंनी घेतला पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचा आढावा; काय ठरलं बैठकीत?
- 1 मार्चपासून ‘हे’ मोठे नियम बदलणार ; थेट तुमच्या खिशावर होणार परिणाम? काय आहे घ्या जाणून..