⁠ 
गुरूवार, ऑक्टोबर 10, 2024
Home | जळगाव जिल्हा | गुरांच्या गोठ्याला भीषण आग! सहा गुरांचा होरपळून मृत्यू, तीन ट्रॅक्टरही जळून खाक

गुरांच्या गोठ्याला भीषण आग! सहा गुरांचा होरपळून मृत्यू, तीन ट्रॅक्टरही जळून खाक

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मे २०२४ । मुक्ताईनगर तालुक्यातील बेलसवाडी येथे गुरांच्या गोठ्याला भीषण आग लागली असून यात सहा गुरांचा होळपळुन मृत्यू झाला. तसेच या आगीत तीन ट्रॅक्टर आणि शेतीसाठी लागणारे अवजारे जळून खाक झाल्याने शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले.

याबाबत असे की, मुक्ताईनगर तालुक्यातील बेलसवाडी येथे शेतकरी धनराज प्रजापती यांच्या गुरांच्या गोठ्याला आज मंगळवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत ६ गुरांचा होळपळुन मृत्यू झाला आहे, तर तीन गुरे जखमी देखील झाले आहे. तसेच या आगीत तीन ट्रॅक्टर आणि शेतीसाठी लागणारे अवजारे जळून खाक झाली.

यामध्ये शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून ऐन खरीप पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्याला हा मोठा फटका बसला आहे. मध्यरात्री लागलेल्या या आगीमुळे शेतकरी धनराज प्रजापती यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. या घटनेची माहिती मिळताच मुक्ताईनगर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेले अंतुरली दूर क्षेत्राचे पोलीस कर्मचाऱ्यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली व स्थानिक नागरिकांच्या मदतीने व अग्निशामक दलाच्या मदतीने आग पहाटेपर्यंत आटोक्यात आणली. मात्र प्रशासनाकडून या शेतकऱ्याला काही मदत मिळेल का हे देखील पाहणे महत्त्वाचे आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.