आयुक्तांचा धडाका : महापालिकेच्या कामात कसुरी करणाऱ्या मलेरिया विभागातील तिघांचे निलंबन

जळगाव लाईव्ह न्युज | १२ मे २०२२ | नवीन आयुक्तांनी कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी चांगलाच धडाका लावला असून कामात कसुरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. बुधवारी आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी मलेरिया विभागातील तीन जणांचे निलंबन केले असून ४१ कर्मचाऱ्यांना शोकॉज नोटीस बजाविल्या आहेत.

maleriya jpg webp


महापालिकेच्या नवीन आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्याकडून कामचुकारपणा करत बाहेर हिंडणाऱ्या कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी अचानक कर्मचाऱ्यांचे हजेरीबुक मागविण्यात येत आहे. दिवसातून केव्हाही दोन वेळेस हजेरीबुक ताब्यात घेण्यात येत असून ड्युटीवर असताना गायब होणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोटीसा बजाविण्यात येत आहेत. पहिल्याच दिवशी आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी मनपाच्या प्रवेशद्वारावर बसून उशिरा येणाऱ्यांची चांगलीच हजेरी घेतली होती. त्यानंतर देखील अधून मधून अचानक हजेरी बुक मागविण्यात येत आहेत. त्यामुळे कामावर हजेरी लावून गायब होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर वचक निर्माण झाला आहे. असे असतांना बुधवारी डॉ. विद्या गायकवाड यांनी अचानक सकाळी ६ वाजता शामाप्रसाद मुखर्जी उद्यान, मलेरिया विभाग, पाणी पुरवठा युनिट व बांधकाम युनिटला भेट देवून तेथील कर्मचाऱ्यांची तपासणी केली.

या तपासणीदरम्यान हजेरी मस्टरवर तफावत आढळून आल्या असून काही लोक हजेरी लावलेली असतांना गायब होते. तसेच काही लोकांकडून आपली जबाबदारी पार पाडली जात नसल्यामुळे मलेरीया विभागातील ३ जणांचे निलंबन करण्यात आले. यामध्ये मलेरिया विभागातील आरोग्य पर्यवेक्षक व दोन मंजुरांचा सामावेश आहे. तसेच मलेरिया विभाग प्रमुख यांचे आपल्या विभागातील कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नसल्यामुळे त्यांना नोटीस बजाविण्यात आली असून इतर विविध विभागातील ४१ कर्मचाऱ्यांना देखील नोटीस बजाविण्यात आल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now