आयुक्त वेतन घेतात पण मुलभूत गरजा पुरवित नाहीत
जळगाव लाईव्ह न्यूज । १४ नोव्हेंबर २०२२ । मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी त्यांची नियुक्ती झाल्यापासून आजपर्यंत केलेल्या प्रशासकीय कामाचे ऑडीट (विशेष लेखापरिक्षण) करण्यात यावे अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल नाटेकर यांनी राज्यपालांकडे केली आहे.
सतीश कुळकर्णी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी गायकवाड यांची नियुक्ती झाली. शासनाकडून त्यांना दरमहा १ लाख ३८ हजार ६५६ रुपये इतके वेतन मिळते. पाच महिन्यात त्यांनी ६ लाख ९८ हजार २८० रुपये इतके वेतन घेतले आहे. शासन त्यांना वेतन व सुविधा प्रदान करीत असताना त्या तुलनेत नागरिकांना मुलभूत गरजा पुरविणे आयुक्तांना क्रमप्राप्त आहे, परंतु तसे दिसत नाही. कामाच्यासंदर्भात योग्य अशी एऊले उचलली नाहीत, असे नाटेकर यांनी तक्रारीत म्हटले असून कार्यतत्पर आयुक्तांची येथे नियुक्ती करावी असे त्यांनी म्हटले आहे.