आयुक्तांचा निर्णय अनिर्णित : कर्मचारी झाले सुस्त

जानेवारी 6, 2023 5:26 PM

जळगाव लाईव्ह न्यूज | ६ जानेवारी २०२३ | जळगाव शहर महानगरपालिकेमध्ये आयुक्त पदाचा तिढा काही समता संपत नाही आहे. यामुळे अजून पर्यंत आयुक्त पदावर असलेले देविदास पवार यांना आयुक्त पदाचे सर्व अधिकार देण्यात आले नाहीत. पर्यायी महानगरपालिका प्रशासन सुस्त झाले आहे. कर्मचारी व अधिकारी आपल्या संबंधित विभागात दिसत नाहीयेत.

jalgoan mnp

तीन तारखेपासून म्हणजे गेले तीन दिवस आयुक्त देविदास पवार हे औरंगाबाद येथे आहेत. सुरू असलेल्या खटल्यामुळे ते औरंगाबाद येथे गेले आहेत. आयुक्त स्वतः सतरा मजलीत नसल्याने कर्मचारी आणि अधिकारी चांगलेच मजेत असल्याचे दिसत आहे. कारण आपापल्या जागेवर कोणीच काम करत नसल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे लवकरच आयुक्तपदाचा काय तो सोक्षमोक्ष लागावा अशी प्रार्थना नागरिक करत आहेत.

जळगाव शहर महानगरपालिकेच्या आयुक्त पदावरून सध्या मॅट कोर्टामध्ये डॉक्टर विद्या गायकवाड विरुद्ध देविदास पवार असा खटला सुरू आहे. गेल्या दोन महिन्यापासून हा खटला सुरू असल्याने देविदास पवार सद्यस्थितीत आयुक्त आहेत. मात्र त्यांना कोणतेही अधिकार घेण्याच्या निर्णय देण्यात आलेला नाहीये. यामुळे ते केवळ नामधारी आयुक्त म्हणून राहिले आहेत. पर्यायी जळगाव शहराचे कित्येक विषय अजून मार्गी लागायचे बाकी आहेत. तर दुसरीकडे नागरिकांनाही मनपात येऊन काहीही काम करता येत नाहीये. यामुळे नागरिकांची चांगलीच गैरसोय होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now