पावसाने उघडीप देताच जळगाव जिल्ह्यात बोचरी थंडी जाणवू लागली

ऑक्टोबर 26, 2022 4:18 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ ऑक्टोबर २०२२ । जळगाव जिल्ह्यात परतीचा पाऊस निघून गेल्यानंतर आता थंडीची चाहूल जाणवू लागली आहे. दिवसभर ऑक्टोबर हिटची झलक आणि संध्याकाळी काहीशी बोचरी थंडी असा प्रकार पावसाने उघडीप घेतल्यानंतर दिसून येत आहे. मंगळवारी जळगावचे तापमान १३.५ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदविले होते. दरम्यान, रात्रीचा पारा घसरल्यानंतर बोचरी थंडी जाणवू लागली आहे. त्यामुळे थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे.

thandi tempreture

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने पूर्णत: उघडीप दिली आहे. दिवसभरच्या वातावरणात काहीशे उन्हाचे चटके आणि गारठा असे दोन्ही प्रकार दिसून येत आहेत. आगामी आठवडाभर तापमानात घसरण होऊन थंडी वाढण्याची शक्यता आहे.

परतीच्या पावसाचा जिल्ह्यात कहर
ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच जळगाव जिल्ह्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला होता. अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने शेती पिकांची चांगलीच नासाडी झाली आहे. परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेत आहे.

यंदा जळगाव जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या १०९.७ टक्के पर्जन्यमान झाले आहे. सप्टेंबर महिन्यात सरासरी गाठलेल्या पावसाने परतीच्या प्रवासात ऑक्टोबरमध्ये ८४.४ मिलिमीटर हजेरी लावली.या वर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात केरळात दाखल हाेण्याची प्रतीक्षा असलेल्या मान्सूनचा वेग प्रारंभी मंदावला हाेता. सध्या जिल्ह्यातून परतीचा पाऊस निघून गेला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now