‎ ग्रीन ह्युमन‎ फाउंडेशनतर्फे शिवाजी उद्यानात स्वच्छता मोहीम‎

जळगाव‎ लाईव्ह न्यूज । २६ मे २०२२ । महानगरपालिका व ग्रीन ह्युमन‎ फाउंडेशनतर्फे शिवाजी उद्यानात‎ स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.‎ या मोहिमेत बाटल्या, प्लास्टिक,‎ कागद आदी ५० किलो कचरा जमा‎ करण्यात आला.

shivajiudhyan

जिल्हा समन्वयक‎ महेंद्र पवार यांनी ‘स्वच्छ भारत‎ मिशन’ या मोहिमेंतर्गत कचरा‎ रस्त्यावर न टाकता कचरा पेटीत‎ टाकण्याचे आवाहन केले आहे.‎ ग्रीन ह्युमन फाउंडेशनचे सर्व सदस्य‎ दररोज पहाटे ६ वाजता उठून‎ शहराच्या वेगवेगळ्या भागात‎ मोहीम राबवून घंटागाडीद्वारे कचरा‎ गोळा करतात. प्रियंका कौराणी,‎ रूपाली किरंगे, काजल सैनी,‎ अंजली रामचंदानी, उदय नेरकर,‎ विक्की पाटील, हितेश शिंपी, कृष्णा‎ पाटील, प्रतीक बारी, समीर चौधरी‎ यांचे याकामी सहकार्य आहे

स्वच्छता मोहिमेत सदस्यांतर्फे गोळा करण्यात आलेला ५० किलो कचरा.‎

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now