मद्यपी ट्रकचालकास नागरिकांनी दिला चाेप

एप्रिल 30, 2022 11:19 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० एप्रिल २०२२ । भुसावळ येथील दारूबंदी विभागाच्या कार्यालयासमाेर मद्यपी ट्रकचालकाने वेगात ट्रक चालवून अनेक वाहनांना हुलकावणी दिली. त्यामुळे काही जणांनी ट्रक थांबवत चालकाला चाेप दिला. हा प्रकार शुक्रवारी दुपारी ३.४५ वाजता घडला, चालकाला शहर पाेलिसांकडे सोपवले.

crime 21 jpg webp

या घटनेमुळे रस्त्यावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. शहर वाहतूक शाखेचे सहायक फाैजदार प्रदीप पाटील यांनी वाहतूक सुरळीत केली. पाेलिसांनी ट्रक (क्र.सीजी-०३-बी.वाय.७३२५) जमा केला. हा ट्रक राजकाेट येथून येऊन अाेडीसाकडे टाईल्स भरून जात हाेता. ट्रक हेलकावे देत चालक होता, सुदैवाने अपघात झाला नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now