मुख्यमंत्री शिंदे आज जिल्ह्यात.. खिर्डीच्या युवकांचा शिवसेनेत प्रवेश!

सप्टेंबर 20, 2022 12:33 PM

Raver News-जळगाव लाईव्ह न्यूज । विनायक जहुरे । राज्याचे मुख्यमंत्री एकनाश शिंदे आज मंगळवारी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून रावेर तालुक्यातील खिर्डी येथील युवकांनी मुक्ताईनगर मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मुख्य उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.

Online mobile sale 1 2

आमदार पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तसेच त्यांच्या विकासाच्या कार्यास प्रभावित होऊन येथील शिवसैनिक दिनेश उर्फ छोटू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व सामाजिक तथा शिवसेना कार्यकर्ते गुणवंत पाटील यांचे नेतृत्वाखाली आमदार यांचे मुक्ताईनगर निवास्थानी दिपक भिरूड, चेतन बोडे, भूषण ढाके, सागर लढे, कुणाल इंगळे, निशिकांत बढे, तिलक झांबरे, दिपक चौधरी, वैभव भिरूड, सुहास इंगळे, योगेश पाटील, मुकेश कोळी, पियुष भिरूड, लोकेश बढे, गणेश सोलंकी, अथर्व बढे, तुषार भिरूड आदी युवकांनी प्रेवेश केला.

याप्रसंगी मुक्ताईनगर तालुका प्रमुख छोटू भोई, देशमुख, अल्पसंख्यांक जिल्हा प्रमुख अफसर खान, दिलीप पाटील, विनोद पाटील, सुरेश पाटील, साबीर भाई बेग, सुभाष महाजन, सुनील पाटील, ग्रा.सदस्य भैय्या पाटील आदी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Stories