जळगाव लाईव्ह न्यूज | ८ मे २०२३ | एकीकडे संपूर्ण राज्यात शेतीच्या संदर्भात अनेक प्रश्न प्रलंबित असताना सरकारदरबारी याची कोणीही नोंद घेत नाही अशी तक्रार नेहेमीच होत असते. मात्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी बैठक घेणार आहेत. प्रश्न समजून घेण्यासाठी
मंगळवारी (ता. ९) दुपारी तीन वाजता मुंबईतील सह्याद्री अतिथिगृहात शेतकरी संघटनांच्या नेत्यांच्या बैठकीचे आयोजन केले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी , बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील, किसान जिहादीचे विनायकराव पाटील, शेतकरी वारकरी संघटनेचे सिकंदर शहा यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीसाठी आमंत्रित केले आहे.
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेपर्यायी राज्यातील शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड केली नाहीये. परिणामी त्यांना पिककर्ज मिळणार नाही. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना सरकारने आर्थिक मदत करावी अशी मुख्य मागणी करण्यात येणार आहे.
किसान सन्मान योजनेतील तांत्रिक अडचणी दूर करुन सर्व पात्र शेतकऱ्यांना त्याचा लाभ द्यावा, पिक विम्यासंदर्भातील अडचणी सोडवाव्या, नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा ज्योतीबा फुले कर्ज मुक्ती योजनेचे प्रोत्साहनपर ५० हजार रुपये अनुदान मिळावे, शेतीसाठी दिवसा वीज द्यावी, यासह अन्य मागण्या या बैठकीत करणार येणार आहेत.