---Advertisement---
वाणिज्य

अर्थसंकल्पाच्या घोषणेपूर्वीच पैशांशी संबंधित ‘हे’ नियम आजपासून बदलले; काय आहेत वाचा..

1st febru
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १ फेब्रुवारी २०२५ । अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज म्हणजेच १ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता संसदेत अर्थसंकल्प सादर करतील. मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प असल्यामुळे यावेळी काय घोषणा होणार देशाचं याकडे लक्ष लागलेय. दरम्यान, अर्थसंकल्पाच्या घोषणेसह, काही कर वाढतील किंवा कमी होतील. काहींच्या किमती वाढतील तर काहींच्या कमी होतील. परंतु फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीसह, तुमच्या पैशांशी संबंधित अनेक बदल बदलले आहेत. आजपासून, म्हणजे १ फेब्रुवारीपासून कोणते नियम बदलले आहेत ते जाणून घेऊया..

1st febru

UPI पेमेंटशी संबंधित नियम बदलले
UPI द्वारे पेमेंट करणाऱ्यांसाठी आजपासून नियम बदलले आहेत. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) नुसार, जर तुमच्या UPI ट्रान्झॅक्शन आयडीमध्ये विशेष वर्ण असतील तर तो आयडी काम करणार नाही. याचा अर्थ असा की १ फेब्रुवारीपासून, जर UPI आयडीमध्ये @, #, !, % असे वर्ण असतील तर आयडी काम करणार नाही. आजपासून फक्त अल्फा-न्यूमेरिक ट्रान्झॅक्शन आयडी वैध असतील.

---Advertisement---

बँकिंगशी संबंधित नियम बदलले
आजपासून बँकिंगशी संबंधित नियम देखील बदलले आहेत. कोटक महिंद्रासह काही बँकांच्या सेवा आणि शुल्कात बदल झाले आहेत. १ फेब्रुवारी २०२५ पासून एटीएम व्यवहारांसाठी मोफत मर्यादा कमी करण्यात आली आहे. त्याच वेळी, इतर बँकिंग सेवांसाठी शुल्क वाढले आहे.

जीएसटीचा हा नियम बदलला
१ फेब्रुवारीपासून जीएसटीशी संबंधित नियमही बदलला आहे. नवीन नियमानुसार, ई-वे बिल आणि ई-इनव्हॉइस सिस्टीमच्या अपग्रेडेड आवृत्त्या वापरताना ज्या जीएसटी करदात्यांची एकूण वार्षिक उलाढाल ५ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांच्यासाठी मल्टी-फॅक्टर ऑथेंटिकेशन अनिवार्य असेल.

गॅस सिलिंडरच्या किमतींत बदल
आज १ फेब्रुवारी रोजी सकाळी गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठा बदल दिसून आला. आजपासून १९ किलोचा व्यावसायिक गॅस सिलेंडर स्वस्त झाला आहे. तेल विपणन कंपन्यांनी त्यात ७ रुपयांची कपात केली आहे.

कार खरेदी करणे महाग
आजपासून कारच्या किमती वाढल्या आहेत. देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने १ फेब्रुवारीपासून त्यांच्या विविध मॉडेल्सच्या किमती ३२,५०० रुपयांपर्यंत वाढवल्या आहेत. वाढत्या खर्चामुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---