जळगाव लाईव्ह न्यूज । १७ सप्टेंबर २०२२ । धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील श्री मंगलमूर्ती बहुउद्देशीय मंडळाचे राजश्री शाहू खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शैक्षणिक वर्ष 2021-22 च्या अखिल भारतीय व्यवसाय सत्र परीक्षा ऑगस्ट 2022 उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव व प्रशस्तीपत्र समारंभ आयोजित करण्यात आला होता. या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून छत्रपती राजे संभाजी शिक्षण शास्त्र महाविद्यालयाचे प्रा.डॉ.विश्वनाथ महाजन, प्रा.शुभम भोई, राजर्षी शाहू आयटीआयचे प्राचार्य कुंदन पाटील, प्रा.परमेश्वर महाजन, प्रा. शुभम पाटील, प्रा. शांताराम वाघ, प्रा.निखिल वाघ व लिपिक प्रथमेश बोरसे हे उपस्थित होते.
यावेळी इलेक्ट्रिशियन मध्ये प्रथम क्रमांक तुषार सूर्यवंशी, द्वितीय क्रमांक कृष्णा सोनवणे, तृतीय क्रमांक निखिल सूर्यवंशी या विद्यार्थ्यांचा तसेच फिटर मध्ये प्रथम क्रमांक भावेश चव्हाण, द्वितीय क्रमांक मयूर पाटील, मयूर पाटील तृतीय क्रमांक व शरद चौधरी या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला, त्या कार्यक्रमाची सुरुवात विश्वकर्मा जयंती निमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले, यावेळी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभम पाटील व आभार परमेश्वर महाजन मानले.