Jalgaon : २५ हजाराची लाच स्वीकारताना ग्राम विकास अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

मार्च 22, 2025 5:02 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मार्च २०२५ । धरणगावातील पंचायत समितीतील अधिकाऱ्याला लाच घेतल्याची घटना ताजी असताना आणखी एक अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे. धरणगाव तालुक्यातील खर्दे बुद्रुक गावातील ग्राम विकास अधिकाऱ्याला २५ हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहात अटक केली. नितीन भीमराव ब्राम्हणे (वय ३७ वर्षे) असं लाचखोर ग्राम विकास अधिकाऱ्याचे नाव असून या कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे.

lach jpg webp

काय आहे प्रकार?
तक्रारदाराने धरणगाव तालुक्यातील खर्दे बुद्रुक गावात २ लाख ७० हजार रुपयांचे काम पूर्ण केले होते, ज्यासाठी त्यांना २ लाख ६४ हजार रुपयांचे चेक मिळाले. मात्र, ग्राम विकास अधिकाऱ्याने या बिलांच्या प्रक्रियेसाठी १० टक्के लाचेची मागणी (२७ हजार रुपये) केली. तडजोडीनंतर ही रक्कम २५ हजार रुपयांवर निश्चित करण्यात आली.

तक्रारदाराने यासंदर्भात जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार, पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार २२ मार्च रोजी दुपारी सापळा रचण्यात आला. आरोपी ब्राम्हणे यांनी २५ हजार रुपये स्वीकारताच त्यांना रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

यांनी केली कारवाई?
पुढील तपास पोलीस करीत आहेत. पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील पथकात पोलीस उपनिरीक्षक सुरेश पाटील, पोलीस नाईक किशोर महाजन आणि पोलीस कॉन्स्टेबल अमोल सूर्यवंशी यांनी सहभाग घेतला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment