होळीला गावी जाताय? मध्य रेल्वे 209 विशेष गाड्या चालवणार, पाहा मार्ग

फेब्रुवारी 11, 2026 12:19 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । होळी सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वे २०९ होळी विशेष गाड्या चालवणार आहे. प्रवाशांना आपल्या कुटुंबीयांसोबत सण साजरा करता यावा यासाठी ही विशेष सुविधा दिली आहे.

train holi

या विशेष गाड्यांमध्ये वातानुकूलित (एसी) विशेष गाड्या, वातानुकूलित सह शयनयान, तसेच सामान्य द्वितीय श्रेणीचे कोच असलेल्या अनारक्षित विशेष गाड्यांचा समावेश आहे. त्यामुळे सणाच्या काळात घराकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

दरवर्षी होळीच्या काळात प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने नियमित गाड्यांवर प्रचंड ताण येतो. ही गर्दी कमी करण्यासाठी आणि प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ व्हावा यासाठी विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

या गाड्या प्रामुख्याने मुंबई- नागपूर -मुंबई, मुंबई रत्नागिरी मुंबई, मुंबई चिपळूण मुंबई आदी प्रमुख मार्गावर धावतील. त्यामुळे सणाच्या काळात प्रवाशांचा जागेचा प्रश्न सुटेल. स्थानकांवर पुरेशा प्रमाणात तिकीट खिडक्या उपलब्ध असतील. सोबतच गर्दीचे योग्य नियोजन करण्यावर रेल्वे प्रशासनाचा भर आहे. या गाड्यांचे वेळापत्रक व थांब्यांची सविस्तर माहिती लवकरच जाहीर होईल.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now