जळगाव लाईव्ह न्यूज । २० जानेवारी २०२२ । भुसावळचे आमदार संजय सावकारे यांची कार परिवहनमंत्री अनिल परब यांच्या नावावर ट्रान्सफर केल्याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. चाैकशीअंती बुधवारी अशोक विठ्ठल पाटील, अकिल शेख रहमान शेख, प्रशांत जगन्नाथ भाेळे या तिघांना पाेलिसांनी अटक केली.

खोटेनगरातील अशोक पाटील यांचा माेबाइल वापरला गेला आहे. दरम्यान, आरटीओ एजंट पप्पू भोळेने हा मोबाइल वापरल्याचा दावा त्यांनी केला आहे. तर अकिल नावाच्या एजंटने त्यांचा मोबाइल नंबर अपडेट करून दिला असल्याची तांत्रिक माहिती सायबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार या तिन्ही जणांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चाैकशी झाली.
दुसरीकडे दक्षता समितीमधील सहायक परिवहन आयुक्त दिनकर मनवर व राजेंद्र मदने या दोघांनी ६ व ७ जानेवारी रोजी जळगावात येऊन आरटीओ कार्यालयात झाडाझडती घेतली. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कामात हलगर्जीपणा केल्याचे आढळले. यानंतर जे. बी. कुलकर्णी, गणेश देवरे, सुनील पाटील व मनोज पाटील या चार लिपिकांना निलंबित करण्यात आले. त्यानंतर बुधवारी पाेलिसांच्या पथकाने चाैकशीअंती तीन जणांना अटक केली आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक लीलाधर कानडे यांनी दिली. दरम्यान पुढील तपासात अजून काय पुढे येते, याबाबत उत्सुकता व्यक्त केली जात आहे.

हे देखील वाचा :
- जळगावात DYSP नितीन गणापुरे यांच्या पथकाचा सट्टा-जुगार अड्ड्यांवर छापा!
- जळगावात जिओ टॉवरच्या जनरेटरमधून डिझेल चोरी करणारा जेरबंद
- Jamner : टायर फुटला अन् पोषण आहाराचा टेम्पो पलटी; दोन हमालांचा जागीच मृत्यू
- मेहुणबारे पोलिसांकडून गुटखा तस्करीचा पर्दाफाश; ४.४७ लाखांचा मुद्देमाल जप्त
- कासोदा शिवारातील २३ शेळ्या-बोकड चोरीचा छडा; मध्यप्रदेशातून दोघे गजाआड






