जळगाव लाईव्ह न्यूज । २२ एप्रिल २०२२ । चाळीसगाव ग्रामीण पोलिस व शहर वाहतूक शाखेने ८ रोजी सायंकाळी धुळे रस्त्यावर बायपासजवळ केलेल्या कारवाईत चाळीसगावात येणारा ५८ किलाे वजनाचा ९ लाखाचा गांजा पकडला हाेता. न्यायालयाने यातील दाेघा आराेपींना २५ तारखेपर्यंत पाेलिस काेठडी सुनावली आहे.
नाकाबंदी व विना क्रमांकाच्या वाहन तपासणी दरम्यान ग्रामीण पोलिस व शहर वाहतूक शाखेने चाळीसगावात येणारा ९ लाखांच्या गांजासह स्कार्पिओ, रोख रक्कम असा सुमारे १३ लाख ३६ हजार ४०० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला हाेता. याप्रकरणी चाळीसगाव शहरातील दत्तवाडी भागातील तुषार अरूण काटकर (वय २८) व सुनील देविदास बेडिस्कर (वय ३८, रा. पिलखोड, मूळ गाव बाळद ता. भडगाव) या दोघांविराेधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. हा गांजा आंध्र प्रदेशातून आणल्याचे पाेलिस चाैकशीत समाेर आले आहे. त्यामुळे पाेलिसांचे एक पथक आंध्र प्रदेशात चाैकशीसाठी जाणार आहे.