⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | गुन्हे | गावठी हातभट्टी दारूविरोधात धडक कार्यवाहीची मोहीम; १०५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

गावठी हातभट्टी दारूविरोधात धडक कार्यवाहीची मोहीम; १०५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज| १९ ऑगस्ट २०२३। जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या निर्देशानुसार व पोलिस अधीक्षक एम. राजकुमार व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक व्ही. टी. भुकन यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागाने गावठी हातभट्टी दारूविरोधात धडक कार्यवाहीची मोहीम राबवीत दोन दिवसांत १०५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

अशी कारवाही प्रथमच झाली आहे.१७, १८ ऑगस्ट या दोन दिवसांत राज्य उत्पादन शुल्क विभागाने एकूण ४० गुन्हे नोंदविले आहेत. १८ ऑगस्टला पोलिस विभागासोबत संयुक्त मोहीम राबविण्यात आली असून, त्यात १०५ गुन्हे नोंदविले आहेत.

यात पोलिस विभागाचे सर्व पोलिस ठाणे व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी यांनी सहभाग घेऊन राज्य उत्पादन शुल्क विभागाने सदर कारवाईमध्ये ९२ आरोपींना अटक केली असून, इतर १३ आरोपींचा गावातील तलाठी व पोलिस पाटील यांच्या सहाय्याने शोध घेण्यात येत आहे.

संबंधित कारवाईमध्ये एक हजार ३२४ लिटर गावठी दारू जप्त करण्यात आलेली असून, गावठी दारू बनविण्यासाठी वापरले जाणारे एकूण १८ हजार ६७३ लिटर रसायन नष्ट करण्यात आले आहे. त्यात एकूण सात लाख ५२ हजार २५५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जुलै व ऑगस्ट महिन्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने एकूण चारशेपेक्षा जास्त गुन्हे दाखल केलेले आहेत. या कारवाईमध्ये ६६ लाखांपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जिल्ह्यात हातभट्टी दारूनिर्मिती व विक्री करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध पहिलीच MPDA ची कारवाई यशस्वी करण्यात आलेली असून, सदर व्यक्तीस अमरावती येथील कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.

जिल्ह्यात हातभट्टी दारूनिर्मिती व विक्री करणाऱ्या व्यक्तींमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. जिल्ह्यात गावठी हातभट्टी दारू नष्ट करण्याचे जिल्हाधिकारी यांचा निश्चय असून, यापुढेही ही मोहीम सुरूच राहणार आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह