सोमवार, डिसेंबर 4, 2023

सधन कुक्कुट विकास गटासाठी अर्ज करण्याचे आवाहन ; कुठे करायचा अर्ज? पहा..

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जुलै २०२३ । जळगाव जिल्ह्यातील यावल, भुसावळ, अमळनेर व चाळीसगाव या चार तालुक्यातून खासगी भागीदारी तत्त्वावर ५० टक्के अनुदानावर सधन कुक्कुट विकास गटाची स्थापना करण्यासाठी विहित नमुन्यतील अर्ज मागविण्यात येत आहेत. आवश्यक व परिपूर्ण कागदपत्रांसह या कार्यालयास प्रस्ताव सादर करण्यात यावेत. असे आवाहन जिल्हा पशूसंवर्धन उपआयुक्त यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे ‌.

शासन निर्णयानुसार प्रत्येक तालुक्यात एका पात्र लाभार्थीची निवड जिल्हा निवड समितीमार्फत करण्यात येणार आहे. जिल्हातील तालुकास्तरावरील पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती – यावल, भुसावळ, अमळनेर व चाळीसगाव यांच्याकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. योजनेबाबतचे अधिक माहिती व अर्जाचा विहित नमुनासाठी पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयाशी किंवा तालुका कार्यालयाशी संपर्क साधावा.असे आवाहन करण्यात आले आहे.