जळगाव लाईव्ह न्यूज । १५ नोव्हेंबर २०२२ । शिवसेनेचे पक्षचिन्ह आणि नावाबाबत ठाकरे गटाने दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र हि याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळली आहे. याच बरोबर याबाबदचा अंतिम निर्णय तातडीने घेण्याचे आदेशही निवडणूक आयोगाला देण्यात आले आहेत.
शिवसेना पक्षाबद्दलचा वाद प्रलंबित असतानाच अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे पक्षचिन्ह गोठवण्याच्या घेतलेल्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे गटाने दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली होती. हि याचिका न्यायालयाने फेटाळली असून अंतिम निर्णय तातडीने घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले आहेत.
निवडणूक आयोगाने घाईघाईने हा निर्णय घेतला असून यात नियमांचं पालन झालेलं नाही. अंधेरी पोटनिवडणूक संपली आहे. त्यामुळे ज्या कारणासाठी चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेण्यात आला होता, ते कारण राहिलेलं नाही. मात्र दिल्ली हायकोर्टाने ही याचिका फेटाळली आहे. मात्र निवडणूक आयोगाचे या सगळ्या संदर्भातील अधिका मान्य केला आहे. तसेच निर्णय तातडीने घेण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.