⁠ 
गुरूवार, सप्टेंबर 19, 2024

गिरीषभाऊ… महापौर बदलाचा जुगार खेळू नका !

0
jalgaon mayor bharti sonawane

माजी मंत्री आणि जळगाव मनपातील भाजपचे नेते गिरीषभाऊ तुम्हाला कोरोनामुक्त रामराम. तुम्ही नशिबवान आहात, अजून एकदाही कोरोना तुमच्याकडे फिरकला नाही. आमच्या सारखा सामान्य माणूस ‘पुन्हा येईन पुन्हा येईन’ च्या धास्तीने मानसिक कोरोनाग्रस्त झालेला आहे. पुन्हा येण्याच्या भीतीने कोरोनासोबतच फडणवीसची सुद्धा भीती वाटायला लागली आहे. आजकाल कोण कोरोना सोबत आणि कोण फडणवीस विरोधात हे सुद्धा समजत नाही. पण तुम्ही फडणवीस सोबत कायम आहात. फारच लकी आहात. ना सीडीची भीती ना ईडीची चिंता.

गिरीषभाऊ, असे कळले की, जळगाव मनपातील भाजपमध्ये महापौर बदलाची टूम सुरू आहे म्हणे. मनपातील भाजपचे कर्ताकरविता आपणच आहात. जळगाव शहराला विधानसभेचा भाजपचा आमदार व लोकसभा मतदार संघाला भाजपचा खासदार निवडून आणायचे श्रेय आता तुमचे एकट्याचेच. मनपा ते दिल्ली व्हाया मुंबई आणि रिटर्न जामनेर अशी भाजपची सत्ता आहे. माफ करा गिरीषभाऊ, कोरोना संसर्गाचा विषाणू मागील वर्षी अवतरला आणि त्याने माणसांची वाट लावली. तुमच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन भाजपला भरभरून यश देणाऱ्या जळगाव शहराला मात्र असुविधांचा कोरोना गेल्या ७/८ वर्षांत लागला आहे. मनपात सुद्धा फारसे काही चांगले घडले नसते. जर कोरोना काळात विद्यमान महापौर भारतीताई सोनवणे आणि स्वीकृत नगरसेवक कैलास सोनवणे हे स्वतःचा जीव तळ हातावर घेऊन बाहेर पडले नसते तर…

mayor bharti sonawane corona

जळगाव मनपातील कार्यपद्धती रसातळाला गेली होती. हॉटेलातून डबे मागवून खाणे आणि खाता-खाता इतरांना शिव्या घालणे सुरू असायचे. २५ कोटी रुपये निधी खर्चाचा घोळ व पत्रापत्री नागरिकांना माहिती आहे. वॉटरग्रेसचा ठेका का काढला, तो पुन्हा का दिला ? हे सुद्धा जळगावकरांना माहिती आहे. रस्ता तयार करण्यापूर्वी रस्ते दुभाजक तयार होणारे जळगाव हे एकमेव शहर आहे. या दुभाजकांचा मूळ ठेकेदार कोण ? दुसरा कोण ? तिसरा कोण ? इथपर्यंतची चर्चा जळगावकरांना माहिती होते. नाल्यावर पूल बांधलेला आहे, तरीही त्याच्या बांधकामाचे टेंडर निघते. शिवाजीनगर ते जिल्हा परिषद भागात वीज जोडणीच्या टेंडरमधील हिस्सेदारीतून ८/१० नगरसेवक भांडतात. टोळके करून फिरणारे आणि प्रत्येक कामात हिस्सेदारीसाठी धावणारे यापूर्वी काही छायाचित्रात दिसले आहेत. सफाई ठेकेदाराकडून दरमहा १५ हजार रुपये मिळतात अशा संभाषणाच्या आॕडिओ क्लिप राष्ट्रवादी काँग्रेसने शेअर केल्या आहेत. असा कित्ती-कित्ती पंचनामा करायचा.

bharati sonawane

उपरोक्त बदनामीच्या गदारोळात गेल्या वर्ष-दीड वर्षात महापौर म्हणून भारतीताई सोनवणे यांची कारकिर्द आश्वासक ठरली आहे. जळगाव शहर कोरोना रुग्ण संख्येत देशात अव्वलस्थानी होते. तेव्हापासून सोनवणे दाम्पत्य स्वतःच्या जीवाची वा कुटुंबाची पर्वा न करता धावधाव धावत आहेत. कैलास सोनवणे यांच्याकडे सोपवलेली तक्रार काही तासात मार्गी लागते. गल्लीबोळात फिरून प्रत्येक गोष्टीचा आढावा घेणारी सोनवणे यांची स्वतंत्र यंत्रणा आहे. ही यंत्रणा आढावा सुद्धा घेते आणि आढावू घटकांना ठिकाणावरही आणू शकते. कोरोना उपचार केंद्रात वर्षभरात सोनवणे दाम्पत्याने दिलेला वेळ हा घरी मुला-बाळांसाठी दिलेल्या वेळेपेक्षा जास्त आहे. केंद्रातील नास्ता, जेवण, सोय, सुरक्षा याचा अनुभव सोनवणे दाम्पत्य वारंवार घेत असते. मनपातील सर्वच विभाग अधिकारीही सध्या तत्परतेने काम करीत आहेत.

mayor bharti sonawane

जळगावकरांसाठीच्या अशा आश्वासक वातावरणात दाद मागण्याची एक जागा महापौर भारतीताई सोनवणे यांच्या कक्षात आहे. तेथे अवेळी नेतृत्व बदलाची घाई गिरीषभाऊ तुमच्या सारख्या चाणाक्ष नेत्याने मुळीच करायला नको. ‘वर्ष भरात जळगाव बदलून दाखवतो’ हे म्हणणे जसे कृतीतून करायला अवघड आहे तसेच खूर्चीसाठी ‘भाऊ मला महापौर करा’ अशा अपेक्षा इतरांनी करणे गैर नाही. पण नेता म्हणून तुम्ही कठोरपणे सांगायला हवे, ‘कोरोनाचा हा काळ जात-समाज याचे गणित पाहून महापौर नियुक्तीचा नाही. आताच्या संकटात स्वतः जगून इतरांनाही जगवायची धडाडी असलेलाच महापौर हवा. सध्या तरी भारतीताई सोनवणे या तसे काम करीत असताना त्यांना पुढे चाल देण्यात काय हरकत आहे ?’ या शहराने दर सहा महिन्यांनी बदललेले महापौर पाहिले आहे. आज त्यांना लग्नपत्रिका देताना कोणीही माजी महापौर असे लिहित नाही. एवढे त्या पदाचे अवमूल्यन झाले आहे. जास्त लिहायची गरज नाही. बाकी माणसांचा, जात-समाजचा लेखाजोखा तुमच्याकडे आहेच.

bharti sonawane

– दिलीप तिवारी, जेष्ठ पत्रकार

(सदर पोस्ट तुम्ही जेष्ठ पत्रकार दिलीप तिवारी यांच्या फेसबुक वॉलवर देखील वाचू शकता.)

दुर्दैवी : पती-मुलाच्या आत्महत्येनंतर महिलेचाही उपचारादरम्यान मृत्यू

0
crime

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मार्च २०२१ । दवाखान्यात दाखल असलेल्या पत्नीच्या उपचारासाठी पैसे नसल्याने गुरुवारी दीपक रतिलाल सोनार (वय ६५) व मुलगा परेश (३४) या पिता-पूत्राने राहत्या घरात विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आदर्शनगरात उघडकीस आली होती. दरम्यान, आता दुर्दैवी बाब अशी की उपचारादरम्यान पत्नीचाही मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. श्रध्दा दीपक सोनार (वय-६०) असे मृत महिलेचे नाव आहे.  

आदर्श नगरात प्लॉट क्रमांक १९० येथे दीपक सोनार हे आपल्या पत्नी आणि मुलगासह राहत होते. दरम्यान, मागील गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या पत्नी न्यूमोनियामुळे एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पत्नीला खासगी रुग्णालयात दाखल केल्यामुळे दोन दिवसात दीपक सोनार यांचे जावाई रूपेश सोनार आणि मुलगी रूपाली सोनार यांनी दीड लाख रुपये रोख कॅश भरली होती. प्रकृती अत्यंत गंभीर असल्यामुळे पुन्हा त्यांना ५ लाख रुपये भरण्यासाठी सांगितले होते. या आर्थिक विवंचनेतून त्यांनी ही टोकाची भूमिका घेतली असल्याने नातेवाईकांकडून बोलले जात आहे. दुपारी मुलगी रूपाली यांनी वडील दीपक सोनार यांना घरी जाण्यास सांगितले होते.

सायंकाळी जावाई व मुलगी पुन्हा त्यांना भेटण्यासाठी आदर्शनगरातील घरी आले. वडील दीपक सोना व भाऊ परेश सोनार यांचे मृतदेह त्यांना आढळून आल्याने रूपालीने एकच आक्रोश केला. याबाबत रामानंद नगर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. काल शुक्रवारी सकाळी दोघांवर अंत्यसंस्कार देखील करण्यात आले. त्यातच  उपचारार्थ दाखल असलेल्या श्रध्दा सोनार यांचा देखील उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.  यामुळे आदर्श नगरातील सोनार कुटुंबातील तिन्ही सदस्यांचे निधन झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

…तर तुम्हाला ‘होम क्वारंटाइन’ची परवानगी मिळणार नाही

0
home quarantine

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मार्च २०२१ । जळगाव जिल्ह्यात जवळपास चार हजाराहून अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हे होम क्वारंटाइन आहेत. परंतु हे रुग्ण नियम पळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत.

 

दरम्यान त्यांच्याद्वारे रुग्ण संख्या वाढत असल्याने ६० वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्ती व व्याधिग्रस्तांना ‘होम क्वारंटाइन’ची परवानगी मिळणार नाही. कोणतेही लक्षणे नसलेले व सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी कोविड केअर सेंटरमध्ये दाखल व्हावे अशा सूचना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी शुक्रवारी दिल्या आहेत.

कोरोना बाधितांना अपवादात्मक परिस्थितीतच होम क्वारंटाइनचा पर्याय दिला जाईल. होम क्वारंटाइनमध्ये राहणाऱ्या रुग्णाने डॉक्टरच्या शिफारसीसह हमीपत्र सादर करणे अनिवार्य असेल. होम क्वारंटाइन असणाऱ्या व्यक्तीच्या घरात एकच कुटुंब वास्तव्यास हवे व स्वतंत्र व्यवस्था असावी, घरी दिवस-रात्र काळजी घेणारी व्यक्ती असावी.

 

बाधित रुग्णाच्या व परिवाराच्या मोबाइलवर आरोग्य सेतू ॲपअसणे आवश्यक आहे. महापालिकेने होम क्वारंटाइन व्यक्तीच्या हातावर शिक्का मारणे, स्टिकर लावणे आदी कामे पथकाने तात्काळ करावेत, अशा सुचना जिखाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

अट्रावल येथील मुंजोबाने घेतला अग्नीडाग

0
munjoba from atraval took the fire

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मार्च २०२१ । यावल तालुक्यातील अट्रावल येथील जागृत मुंजोबा देवस्थानाने (दि.१२ मार्च) रोजी संध्याकाळी ४ वाजेच्या सुमारास अग्नीडाग घेतला आहे.  

दरम्यान यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सालाबाद प्रमाणे लाखो भाविकांच्या उपस्थितीत भरणारी यात्रा ही प्रशासनाच्या वतीने दंडात्मक कारवाई करीत रद्द करण्यात आली होती. यावल तालुक्यातील अट्रावल येथील जागृत देवस्थान तथा भक्तांच्या नवसाला पावणारा म्हणुन ख्याती असलेल्या मुंजोबाची यात्रा सालाबाद प्रमाणे दरवर्षी माघ महीन्यात शनिवार आणी सोमवार या दिवसी भरत असते त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील खानदेशवासी भाविक मुंजोबाच्या दर्शनासाठी येत असतात मात्र यंदाही यात्रा रद्द करण्यात आली होती.

यात्रा संपल्यावर मुंजोबा हे कोणत्याही दिवसी अग्निडाग घेत असतो अशी भाविकांची श्रद्धा आहे. या कोरोनाचे संकट पुनश्च ओढवल्याने अग्निडाग घेतल्यानंतर होणारे महाप्रसादाचे कार्यक्रम ही रद्द करण्यात आले आहे

मुदत संपलेल्या गाळे ताब्यात देण्यासाठी लाच घेणारा अधिक्षक एसीबीच्या जाळ्यात

0
sanjay dhamal

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मार्च २०२१ । एरंडोल नगरपालिका संकुलातील मुदत संपलेल्या गाळे द्यावे यासाठी दीड लाख रूपयांची लाख घेणाऱ्या लाचखोर कार्यालय अधिक्षकास लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, नगरपालिका दुकान संकुलातील करार संपल्याने सील केलेले गाळे लिलावामध्ये ताब्यात देवून इतर गाळ्यांना नोटीस न देण्यासाठी कर निर्धारण व प्रशासकीय विभागातील कार्यालय अधिक्षक संजय दगडू ढमाळ (वय-५१) रा. म्हाडा कॉलनी अमळनेर यांनी दोन लाख रूपयांची लाचेची मागणी केली होती.

याबाबत जळगाव येथील लाचलुचपत विभागाकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार आज लाचलुचपत विभागाने दुपारी सापळा रचून संशयित आरोपी संजय ढमाळ यांना तडजोड करून दीड लाख रूपये स्विकारतांना रंगेहात पकडले.

ही कारवाई धुळे एसीबी उपअधिक्षक सुनिल कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुधीर सोनवणे, संतोष हिरे, कृष्णकांत वाडीले, प्रशांत चौधरी, राजन कदम, सुधीर मोरे यांनी केली.

यावल वन विभागाच्या कारवाईत 13 घनमीटर लाकूड व आरायंत्र जप्त

0

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मार्च २०२१ । यावल वन विभागाच्या कारवाईत धाडसत्रात बाभूळ, निलगीरी, निम व इतर असे एकूण 13 घनमीटर माल आढळून आल्याने  तो जप्त करुन मुख्य विक्री केंद्र, चोपडा येथे जमा केला.

यावल वन विभागाच्यावतीने 10 मार्च, 2021 रोजी वनसंरक्षक, धुळे (प्रादेशिक), डी. डब्लु. पगार व उप वनसंरक्षक यावल वन विभाग जळगाव पद्मनाभा एच.एस. यांच्या मार्गदर्शनाखाली व सहाय्यक वनसंरक्षक (वनीकरण व वन्यजीव) चोपडा व्ही.एच.पवार यांच्या नेतृत्वात वनपरिक्षेत्र अधिकारी फिरते पथक व्ही. व्ही. कुटे व वनपरिक्षेत्र अधिकारी चोपडा (प्रादेशिक) डी. एच. लोंढे व क्षेत्रीय कर्मचारी यांच्यासह शेख मुखतार शेख युसुफ रा. मन्यार मळी, हमीद नगर, चोपडा येथे गोपनीय पद्धतीने अचानक सकाळी 10 वाजता वरीष्ठ अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष घटनास्थळी जावून आकस्मित धाडसत्र राबिवले.

या धाडसत्रात बाभूळ, निलगीरी, निम व इतर असे एकूण 13 घनमीटर माल आढळून आल्याने  तो जप्त करुन मुख्य विक्री केंद्र, चोपडा येथे जमा केला. तसेच 18 इंच व्यासाचे विना परवाना उभे आरायंत्र आढल्याने सहाय्यक वनसंरक्षक (वनीकरण व वन्यजीव) चोपडा यांच्या समक्ष व वनपरिक्षेत्र अधिकारी फिरते पथक व वनपरिक्षेत्र अधिकारी, चोपडा (प्रादेशिक) यांच्या उपस्थितीत नियमांनुसार पंचनामा करुन ते जप्त करण्यात येऊन मुख्य विक्री केंद्र, चोपडा येथे सुरक्षित ठेवण्यात आले आहे.

सदरची कार्यवाही केल्याने अवैध लाकूड व्यापारी तथा व्यवसायीकांमध्ये दहशत तयार झालेली असून या कार्यवाहीचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे. सदरची कार्यवाही सकाळी 10 वाजेपासून ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत पूर्ण करण्यात आली. या कार्यवाहीनुसार वनगुन्हाची नोंद घेत पुढील तपास सुरु आहे. असे यावल वन विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

 

जळगाव जिल्ह्याचा पाॅझिटीव्हीटी रेट 7.36%

0
corona-updates

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मार्च २०२१ । जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखणे व कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. 

याचाच एक भाग म्हणून बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन अशा संशयित व्यक्तींचे स्वॅब घेऊन त्यांच्या तपासणीवर भर देण्यात येत आहेत.  जेणेकरून कोरोनाची साखळी खंडीत करता येईल.

याकरीता जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत विक्रमी 5 लाख 5 हजार 649 संशयित व्यक्तींचे स्वॅब घेऊन तपासणी करण्यात आली आहेत. यापैकी 4 लाख 35 हजार 403 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह तर 68 हजार 662 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

 

याचाच अर्थ जिल्ह्याचा पाॅझिटीव्हीटी रेट हा 7.36% इतका आहे.

शेतात दादर कपात असताना दिसले बिबट्याचे तीन पिल्ले आणि….

0
nandra forest area leopard calves

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मार्च २०२१ । पाचोरा तालुक्‍यातील नांद्रा परिसरालगतच्या वनविभागाला लागुन असलेल्या शेतात आज दादर पिकाची कापणीसाठी गावातील मजूर वर्ग गेले असता त्या ठिकाणी त्यांना बिबट्याचे तीन छोटे पिल्ले आढळून आले आहे. बछडे आढळून आल्‍याने मजुरवर्ग काम सोडून पळाले.

पाचोरा तालुक्यातील नांद्रा शिवारा लगतचा जंगलाला लागून असणारा ताडमळ्यामध्ये शेतजामिन असणारे येथील संजय रामराव पाटील यांच्या मालकीच्या गट क्रं. १७५ च्या शेतात दि. १२ रोजी दादर कापणीसाठी गावातील मजूर वर्ग गेले होते. यावेळी त्यांना शेतात तीन छोटे पिल्ले निदर्शनास आली. त्यावेळी प्रत्यक्षदर्शीने भूषण तावडे व इतर शेतकरी यांनी तात्काळ ही गोष्ट वन विभागातील कर्मचारी यांना भ्रमणध्वनीवरून सांगितली,

त्यानुसार काही क्षणातच त्या ठिकाणी वन विभागाचे वन क्षेत्र पाल डि. एस. देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सुनील भिलावे, जगदिश ठाकरे, अमृता भोई, ललित पाटील, प्रकाश सूर्यवंशी, रामसिंग जाधव,राहुल कोळी,सचिन कुमावत यांचे पथक दाखल होऊन त्यांनी तेथेच त्या शेतात एका ठिकाणी तिघे पिल्ले सुरक्षित ठेवण्यासाठी छावणी केली जेणे करून बिबटी मादी येऊन त्यांना सुखरुप घेऊन जाईल व त्याठिकाणी संपूर्ण वनविभागाचे कर्मचारी लक्ष ठेऊन आहेत व प्रसंगी राञीला नाईट व्हिजन कॕमेरा लावून नजर ठेवण्यात येणार आहे परंतु आद्याप शेतकरी वर्गाच्या जमिनीत अजूनही दादर, मक्का, गहू, कपासी असे पिके काढण्याचे असून त्यामुळे शेतात एकटे व्यक्ती, महिलावर्ग, किंवा बालके जाण्यास घाबरत असून पुन्हा एकदा संपूर्ण वनखात्यात वन विभागातील संरक्षण कंपाऊंडचा विषय ऐरणीवर आला आहे जर त्या जंगलाला कंपाऊंड करण्यात आले तर वन्य प्राणी गावाकडे वाटचाल करणार नाही व प्रसंगी अशा या अजून घडणाऱ्या हिँस्ञ घटना घडणार नाही. मागेही झाडावर बिबट्या चढण्याचं त्याबरोबरच गावालगतच्या शेताजवळ गाई वासरांचा फडशा पाडल्याचा घटना ताज्या असतानाच आताही हि बिबट्या मादी आपल्या पिलांना सोबत कुठपर्यंत या परिसरात घेऊन वास्तव्य करते किंवा निघून जाते यावर आता वन विभागाला बारीक लक्ष ठेवावे लागणार असून प्रसंगी रेस्क्यू ऑपरेशन ही करावे लागू शकते.

जळगाव कोरोना ब्रेकिंग : एकाच दिवसात ९८२ रुग्ण ! वाचा तुमच्या परिसरातील अपडेट्स..

0
corona-updates

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मार्च २०२१ । जळगाव जिल्ह्यातील कोरोना तांडव कमी होण्याचे नाव घेत नाहीये. आज जळगावात विक्रमी तब्बल ९८२ नवीन आढळून आले आहेत. दरम्यान, आज ५ जणांचा मृत्यू झाला आहे.

जळगाव जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट अधिक तीव्रतेने जाणवत आहे. दुसऱ्या लाटेत आता रुग्णसंख्या जशी वाढत आहे, तसे मृत्यूही वाढत आहेत. पाच दिवसांपासून दररोज पाच-सहा रुग्णांचा बळी जात आहे. शुक्रवारी ५ जणांचा बळी गेला. त्यामुळे एकूण बळींचा आकडा १४३२ झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकुण ६८ हजार ६९२ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी ६० हजार ५१७ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ६ हजार ७१३ बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे.

जळगाव शहरात सर्वाधिक ३६३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. जळगाव ग्रामीण-१९, भुसावळ-१९८, अमळनेर-१४, चोपडा-७४, पाचोरा-३०, भडगाव-१, धरणगाव-८, यावल-११, एरंडोल-४, जामनेर-४०, रावेर-१८, पारोळा-४७, चाळीसगाव-१४२, मुक्ताईनगर-४, बोदवड-६ आणि इतर जिल्ह्यातून ३ असे एकुण ९५४ बाधित रूग्ण आढळून आले आहे. आता जिल्ह्यात एकूण ६८,६६२ पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.