⁠ 
रविवार, डिसेंबर 15, 2024
Home | कोरोना | …तर तुम्हाला ‘होम क्वारंटाइन’ची परवानगी मिळणार नाही

…तर तुम्हाला ‘होम क्वारंटाइन’ची परवानगी मिळणार नाही

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मार्च २०२१ । जळगाव जिल्ह्यात जवळपास चार हजाराहून अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हे होम क्वारंटाइन आहेत. परंतु हे रुग्ण नियम पळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत.

 

दरम्यान त्यांच्याद्वारे रुग्ण संख्या वाढत असल्याने ६० वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्ती व व्याधिग्रस्तांना ‘होम क्वारंटाइन’ची परवानगी मिळणार नाही. कोणतेही लक्षणे नसलेले व सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी कोविड केअर सेंटरमध्ये दाखल व्हावे अशा सूचना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी शुक्रवारी दिल्या आहेत.

कोरोना बाधितांना अपवादात्मक परिस्थितीतच होम क्वारंटाइनचा पर्याय दिला जाईल. होम क्वारंटाइनमध्ये राहणाऱ्या रुग्णाने डॉक्टरच्या शिफारसीसह हमीपत्र सादर करणे अनिवार्य असेल. होम क्वारंटाइन असणाऱ्या व्यक्तीच्या घरात एकच कुटुंब वास्तव्यास हवे व स्वतंत्र व्यवस्था असावी, घरी दिवस-रात्र काळजी घेणारी व्यक्ती असावी.

 

बाधित रुग्णाच्या व परिवाराच्या मोबाइलवर आरोग्य सेतू ॲपअसणे आवश्यक आहे. महापालिकेने होम क्वारंटाइन व्यक्तीच्या हातावर शिक्का मारणे, स्टिकर लावणे आदी कामे पथकाने तात्काळ करावेत, अशा सुचना जिखाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

author avatar
Tushar Bhambare