जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जानेवारी २०२२ । चोपडा येथील भाजपचे माजी शहराध्यक्ष नरेंद्र साहेबराव पाटील यांच्या शहरातील घरी उभ्या असलेल्या चारचाकी वाहनाची मागील काच अज्ञात व्यक्तींनी फोडल्याची घटना २३ रोजी घडली. या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शहर पोलिसांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

भाजपचे माजी शहराध्यक्ष नरेंद्र पाटील यांचे शहरातील पुंडलिक नगरमधील राहत्या घरी २३ रोजी रात्री कार उभी हाेती. महिंद्रा कंपनीच्या या चारचाकी गाडी (एमएच १९, ३४९३) ची अज्ञात व्यक्तींनी मागील काच फोडून नुकसान केले आहे. दरम्यान, त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांवर दहशत निर्माण व्हावी, या हेतूने हा प्रयत्न केल्याचे निवेदनात म्हटले आहे. नुकसान करणाऱ्याचे उद्दिष्ट काय? याचा विस्तृत तपास करावा व दोषींना कठोर शासन करावे, यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे निवेदन देण्यात आले. तसेच पोलिसांनी चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर शहराध्यक्ष गजेंद्र जैस्वाल, जीवन पाटील, तुषार पाठक आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

हे देखील वाचा :
- जळगावात DYSP नितीन गणापुरे यांच्या पथकाचा सट्टा-जुगार अड्ड्यांवर छापा!
- जळगावात जिओ टॉवरच्या जनरेटरमधून डिझेल चोरी करणारा जेरबंद
- Jamner : टायर फुटला अन् पोषण आहाराचा टेम्पो पलटी; दोन हमालांचा जागीच मृत्यू
- मेहुणबारे पोलिसांकडून गुटखा तस्करीचा पर्दाफाश; ४.४७ लाखांचा मुद्देमाल जप्त
- कासोदा शिवारातील २३ शेळ्या-बोकड चोरीचा छडा; मध्यप्रदेशातून दोघे गजाआड






