मोठी बातमी : रश्मी ठाकरे घेणार एकनाथ शिंदेंच्या मंडळातील देवीचे दर्शन
जळगाव लाईव्ह न्यूज । २८ सप्टेंबर २०२२ । शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे एकनाथ शिंदेंच्या मंडळातील देवीचे दर्शन घेणार आहेत. असे म्हटले जात आहे. यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहेत.
शिवसेनेचे नेते आनंद दिघे यांनी टेंभी नाका येथे जय आंबे देवीची स्थापना केली होती. या ठिकाणी दरवर्षी नवरात्र महोत्सव साजरा करण्यात येतो. यावेळी मोठ्याप्रमाणावर भाविक याठिकाणी गर्दी करतात. या ‘जय आंबे’ देवीच्या महोत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही सहभाग असतो.या ठिकाणी रश्मी ठाकरे दर्शन घेणार आहेत असं म्हटलं जात आहे.
एकनाथ शिंदे यांच्या या देवीच्या दर्शनासाठी यंदा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. ठाण्यातील जय आंबे नवरात्रोत्सवाला गुरुवारी रश्मी ठाकरे या भेट देणार आहेत. त्यांच्या हस्ते आरती केली जाणार आहे. रश्मी ठाकरे या ठाणे आणि मुंबईतील नवरात्रोत्सवाला भेट देणार आहेत.यावेळी त्या दर्शन घेणार आहेत.