⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

मोठी बातमी ! आ. चंद्रकांत पाटील करणार खडसेंना मतदान

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जून २०२२ । मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील व एकनाथराव खडसे यांच हाड वैर संपूर्ण जिल्ह्याला ज्ञात आहे. ते दोघे नेहेमीच एकमेकांवर नेहमी आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतात मात्र विधानपरिषद निवडणुकीत आमदार चंद्रकांत पाटील खुद्द खडसेंना मतदान करणार आहेत.

यावेळी पत्रकारांशी बोलताना पाटील म्हणाले कि, ‘मी अपक्ष आमदार असलो तरी शिवसेनेच्या विचाराने वाढलो आहे. त्यामुळे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे सांगतील त्याप्रमाणे मी मतदान करेन, यात मी एकनाथ खडसे असो की इतर कुणी असो, त्यांना मतदान करेन’ आमदार चंद्रकांत पाटील एकनाथ खडसे हे एकमेकांचे पक्के राजकीय वैरी समजले जातात. दोघांकडून एकमेकांवर नेहमी आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतात. त्यातच आता आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. आधी खडसे समर्थक पण भाजपात असलेले आमदार सावकारे म्हणाले होते कि मी नाथाभाऊंना मतदान करणार नाही. यामुळे आता खडसे यांना त्यांचे समर्थक नाही तर विरोधक मदत करणार हे नक्की झाल आहे.

विधानपरिषद निवडणूक अतिशय चुरशीची होणार हे आता नक्की झाले आहे. त्यात एकनाथराव खडसे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने तिकिट दिल्याने जिल्ह्यासाठी हि निवडणूक महत्वाची झाली आहे. जिल्हावासियांनाही यात मोठा इंटरेस्ट येत आहे. या निवडणुकीत भुसावळचे आमदार संजय सावकारे हे नाथाभाऊंचे समर्थक असल्याने ते त्यांना मतदान करणार असल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली होती. यातच संदर्भातील वृत्त प्रकाशित होताच राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते.

दरम्यान, या प्रकरणी स्वत: आमदार संजय सावकारे यांनी आज बोलतांना स्वत:ची भूमिका मांडली. ते म्हणाले की, मी भारतीय जनता पक्षाचा निस्सीम कार्यकर्ता असून पक्ष सांगेल त्यांनाच मी मतदान करणार आहे. मी एकनाथराव खडसे यांना मतदान करेल हा दावा कपोलकल्पीत असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, एकनाथराव खडसे हे आपल्यासाठी आदर्श होते, आणि यापुढेही राहणार असल्याचे आमदार संजय सावकारे यांनी याप्रसंगी आवर्जून नमूद केले. यामुळे या प्रकरणी आमदार संजय सावकारे यांनी आपली भूमिका प्रसारमाध्यमांसमोर स्पष्टपणे मांडल्याचे दिसून आले आहे. आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी मी अपक्ष आमदार असलो तरी शिवसेनेच्या विचाराने वाढलो आहे. त्यामुळे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे सांगतील त्याप्रमाणे मी मतदान करेन, यात मी एकनाथ खडसे असो की इतर कुणी असो, त्यांना मतदान करेन असं म्हटल्याने त्यांनीही आपली भूमिका मांडली आहे.