⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

मोठी बातमी : जळगावात चार बोगस डॉक्टरांवर कारवाई

जळगाव लाईव्ह न्यूज । २० जुलै २०२२ । जिल्ह्यातील अनेक भागात पदवी नसताना वैद्यकिय सेवा करत असलेल्‍यांची सुळसुळाट आहे. वैद्यकिय पदवी नसताना रूग्‍णांच्‍या जीवाशी खेळ केला जातो. अशा बोगस डॉक्‍टरांवर कारवाईचा बडगा उचलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यात चार बोगस डॉक्टरांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.

चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे परिसरातील पिलखोड येथे ही कारवाई करण्यात आली असून यात चार बोगस डॉक्टरांचा समावेश आहे. ही कारवाई डॉ. संदीप निकम, दिपक वाणी, विलास भोई, आर. आय. पाटील, डॉ.धीरज पाटील यांनी केली आहे. या कारवाईने मेहुणबारे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

यांच्यावर कारवाई
चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे परिसरातील पिलखोड येथे डॉ. संजय साळुंखे, डॉ. मृनाल टी. सरकार तर उपखेड येथील तन्मय दिपक पाठक, पोहरे येथे शहाजात कोमल मुजुंमदार असे चौघा बोगस डॉक्टरांचे नावे असून कारवाई पथकांनी चौघा बोगस डॉक्टरांना मेहुणबारे पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.