जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मे २०२३ । जळगाव जिल्ह्यत झालेल्या वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या केळी पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे आता बळीराजा पुन्हा संकटात सापडला आहे.
नुकताच जिल्ह्यात विविध ठिकाणी रस्त्रीच्या वेळी जोरदार पाऊस झाला. यामळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. २९ मेच्या रात्री १२.३० वाजे पासुन रात्री ३ वाजेपर्यंत आलेल्या वादळी वाऱ्यामुळे यावल तालुक्यातील मारूळ, बोरखेडा बु॥, परसाडे, कोळवद, वड्री, मोहराळा , कोरपावली, महेलखेडी ,आडगाव , कासारखेडा व डोंगर कठोरा या परिसरातील सुमारे १९५ हेक्टर वरील केळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कृषी अधिकारी पी.आर. कोळी यांनी हि माहिती दिली आहे.