---Advertisement---
गुन्हे भुसावळ

आधी लग्नाचे वचन, नंतर अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; भुसावळातील धक्कादायक घटना

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ सप्टेंबर २०२३ । मुलींना प्रेम जाळ्यात ओढून लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार होणाऱ्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहे. अशीच एक घटना भुसावळ तालुक्यातून समोर आलीय. अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. याबाबत संशयीत तरुणाला अटक करण्यात आली असून भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime rep jpg webp

नेमका काय आहे प्रकार?
या घटनेतील पीडित मुलगी ही भुसावळ तालुक्यातील एका गावात परिवारासह वास्तव्यास असून यापूर्वी २०१९ ते आतापर्यंत पीडित मुलगी ही अल्पवयीन असताना तिला लग्नाचे आमिष दाखवत त्याच गावात राहणारा रुपेश मंगल पाटील याने तिच्यावर अत्याचार केला. तसेच तू माझ्यासोबत नाही आली तर तुझ्या घरच्या लोकांना त्रास देईल अशी धमकी दिली.

---Advertisement---

त्यामुळे तिने हा प्रकार घरच्यांना सांगितला नाही. दरम्यान २ ऑगस्ट रोजी हा प्रकार तिला असह्य झाल्याने आपल्यावर झालेली आपबिती तिने घरच्यांना सांगितला. त्यानुसार तिच्यासह नातेवाईकांनी बुधवार २० सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी रुपेश मंगल पाटील यांच्या विरोधात भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णा पिंगळे करीत आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---